नवरात्र दुर्गा महोत्सव बेटकबिलोली येथे उपसरपंच सौ सविता राहुल पा नकाते यांच्या वतीने आरती व  प्रसाद

129

 

नायगांव प्रतिनिधी -हणमंत चंदनकर

नायगाव तालुक्यातील बेटकबिलोली येथील उपसरपंच सौ सविता राहुल पा नकाते यांच्या वतीने नवरात्र दुर्गा महोत्सव व दसरा निमित्त आज 05/10/2022 रोजी सांयकाळी माता अभिषेक पुजन आरती व प्रसाद वाटप करण्यात आले उपसरपंच सौ सविता राहुल पा नकाते यांच्या वतीने सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होत आसतात.

- Advertisement -

बेटकबिलोली हे गांव धार्मिक कार्यात तालुक्यात सदैव आग्रसर असून येथिल हानुमान मंदिरावर दैनंदिन काकडा व भजन कीर्तन प्रवचन आदी होत आसतात यात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच श्री राहुल पा नकाते यांचा मोठा वाटा आसतो.

यासोबतच महाकाली माता,लक्षीमाता विठल रूक्मिणी , महादेव आदी मंदीरे गावात असून विविध थोरपुरूषाच्या जंयत्या व धार्मिक सामाजिक कार्यक्रम समस्थ गावकर्याच्या वतीने राबवले जातात यांचाच एक भाग म्हणून नवरात्र दुर्गा महोत्सव आयोजित करण्यात आला होता व आज रोजी गावच्या उपसरपंच सौ सविता राहुल पा नकाते याची आरती होती आरती व प्रसाद निमित्त गावातील भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.