दर दोन महीण्याला जनता दरबार घेणार – आ.राजेश पवार 

आ.पवार च्या जनता दरबारात तक्रारीचा पाऊस

436

 

 

नायगाव  प्रतिनिधी – लक्ष्मण बरगे

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत आ.राजेश पवार यांनी सोमवारी नायगाव तहसील मध्ये दि.३ ऑक्टोबर रोजी  जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबारात तालुक्यातील विविध कामाबदच्या तक्रारीचा पाऊस पडला जनतेची कामे वेळेवर होत नसतील तर अधिकारी व कर्मचा-यांनी बदली करून घ्यावे अन्यथा पुढील काळात कार्यवाही सामोरे जावे लागेल अशा इशारा आ.पवार यांनी दिला.

 

        या जनता दरबाराला आ.राजेश पवार,माजी.जि.प.सदस्या पुनमताई पवार ,बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी,तहसीलदार गजानन शिंदे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर. वांजे, पाणी पुरवठा विभागाचे सरनाईक, महावितरणचे उप अभियंता गणेश दंडगव्हाळ ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता  बासरकर, टि.एच.ओ पबितवार, सी.डी.पि.ओ राजुरे , वैद्यकीय अधिकारी डॉ.गुटुरकर, नायब तहसीलदार डि.डी.लोढे , विस्तार अधिकारी शेख लतिफ व बहुतांशी विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी, तलाठी, मंडळ, ग्रामसेवक यांचा समावेश होता.

 

या बैठकीत नायगाव तालुक्यातील हजाराच्या वर नागरीक उपस्थिती होते या बैठकीत विज वितरण , पी.एम.किसान योजना पाणी पुरवठा ची बोगस कामे , घरकुल ,गायगोठा , जमीनेचे वाद , रस्त्यावरील अतिक्रमण , पांदण रस्ते या सह अनेक कामे वेळेवर होत नाही अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीचे उतरे देत आहेत अशा तक्रारी अनेकांनी केल्या तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे जवळपास चार तास तक्रारीराचा पाऊस सारखा सुरुच होता.

तालुक्यातील एक एक तक्रार करताच संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना उठवून त्याच्या हातात माईक देऊन तक्रारीचे उत्तर देण्यास भाग पडले विशेष म्हणजे चार तास बैठक होऊनही तक्रारी काही संपल्या नव्हत्या.झालेल्या तक्रारी पैकी काही तक्रारीचा निपटारा जागेवर झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले .

या वेळी आ.पवार म्हणाले की अतिवृष्टी चे अनुदान बॅकेला मिळाले आहे तरी नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिका-यांनी शेतक-यांना अनुदान दिवाळी पुर्वी वाटप करून शेतक-यांची दिवाळी गोड करा असा आदेश उपस्थितीत बॅक अधिका-यांना देत  शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेची कामे वेळेवर करा अन्यथा या पुढे तुमची गय करणार नाही .जर जनतेची वेळेवर कामे होत नसतील तर बदली करून घ्या आजच्या जनता दरबारात तक्रारी घेऊन खुप नागरीक आलेत यांचा आर्थ कामासाठी नागरीक हतबल झाले आहेत त्यामुळे पुढील काळात दर दोन महीण्याला मी नायगाव ,उमरी ,धर्माबाद येथे जनता दरबार घेणार आहे .जेणे करून जनतेच्या अडचणी सोडवल्या जातील व अडचणीत असलेल्यानां मदत होईल जनतेनी कोणतेही काम अडले असेल तर मला माॅसेज करावा असे आवाहन आ.पवार यांनी केले .

 

 

पत्नीने केली आलुवडगावची तक्रार पती कडे ….

माझ्या आलुवडगावात सरपंच हे मनमानी करत गेल्या अडीच वर्षात  गावाला मिळालेला  पंधराव्या वित्त आयोगाचा निधी विकास कामासाठी  खर्च करत  नाहीत त्यामुळे निधी तसाच खात्यावर पडून आहे .  गावात अनेक समस्या असल्याने जनता परेशान आहे .त्यामुळे सरपंचावर काय कार्यवाही करता येते ते करा अशी मागणी पुनमताई पवार यांनी याच जनता दरबारात आ.पवार यांच्या कडे केली या बाबत आ.पवार यांनी निधी का खर्च झाला नाही त्या बाबत चौकशी करा अशा आदेश गटविकासाधिका-यांना दिले .

या बैठकीला भाजपाचे तालुका अध्यक्ष कोडिंबा पाटील शिदे , बाबासाहेब हंबर्डे , श्रीहरी देशमुख , लक्ष्मण पा.सुजलेगाव नागेश पा काहाळेकर ,चंद्रकात चव्हाण ,ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर , ग्रामसेवक व्यंकटेश पाटील , साईनाथ चव्हाण , यादव सुर्यवंशी , धनराज केत्ते ,खैरनार , प्रल्हाद गोरे , रवि नव्हारे , शिदे ,बी.जी.रातोळीकर , माने , जाधव ,मुदखेडे , कुलकर्णी , मदेवाड , यांच्या सह तलाटी संघटनेचे अध्यक्ष मुंडे , बालाजी राठोड यांची उपस्थिती होती

 

या बैठकीत तालुक्यातील एक हजार च्या वर नागरीक उपस्थित होते. आ.पवार यांनी तालुक्यातुन आलेल्या नागरीक व कर्मचा-यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती .

Leave A Reply

Your email address will not be published.