मतदार ओळखपत्राला आधारकार्डला जोडण्याची नायगाव तालुक्यात मोहीम सुरू.

सर्व मतदारांनी आपल्या मतदान कार्डला आधार कार्ड जोडून घ्यावे... तहसीलदार शिंदे साहेब यांचे आवाहन.

52

 

नायगाव/शेषेराव कंधारे

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडण्याकरिता व प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून आधार संकलनाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्यानुसार नायगाव तहसील व तालुक्यातील बी एल ओ मार्फत मतदान ओळखपत्राला आधारजोडणीचे काम प्रगतीपथावर सुरू असुन सर्व मतदारांनी मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडावे असे आवाहन तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहे.

- Advertisement -

सदर कार्यक्रमांचा उद्देश मतदाराशी ओळख प्रस्थापित करणे, मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. मतदार याद्यांच्या प्रमाणिकरणासाठी व मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राला आहे. आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम १ ऑगस्टपासून हाती घेतला आहे.

त्या अनुषंगाने नायगाव तालुक्यात मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू आहे.निवडणूक विभागाकडून व्होटर हेल्पलाईन अॅप विकसित केले आहे.या अॅपच्या माध्यमातून मतदारांना मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडता येईल.

आपले मतदान केंद्रासाठी निवडणूक विभागाद्वारे नियुक्त केलेल्याई मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी घरोघरी भेट देत आहेत. मतदार यादीतील १०० टक्के मतदारांशी संपर्क करून मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे तरी सर्व मतदारांनी मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडावे असे आवाहन तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.