स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यामुळेच आज आपण ताठ मानेने जगतोय- पो.नि.संकेत दिघे

65

 

 

नायगांव प्रतिनिधी – तानाजी शेळगावकर-

शंकरनगर- येथील श्री भास्करराव बापूराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल,व ज्यु. कॉलेज शंकरनगरच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संकेत दिघे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. पी.पांडेय होते शाळेच्या प्रांगणात सकाळी ठीक 8:30 वाजता विद्येची देवता सरस्वती व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच मराठवाडा गितगायन व मराठवाडा शौर्य गाथेचे वाचन करण्यात आले.

- Advertisement -

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदशनपर भाषणात आज जो आपण मोकळा श्वास , ताठ मानेने जगतोय ते केवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या दिलेल्या बलिदानामुळे स्वतःच्या प्राणाची आहुती दिली खरं तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु मराठवाडा हैद्राबादचा निजाम यांच्या तावडीत होता यांच्या राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला तैंव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

निजाम तत्कालीन भारतातील सर्वात बलाढ्य संस्थानिक होता निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागातून प्रेरणा घेत स्वातंत्र्य लढा उभारला मराठवाड्याच्या प्रत्येक गावागावात हा लढा लढला गेला प्रत्येक गावागावातून सैनिक पुढे आले त्यांनी त्यांच्या प्राणाची पर्वा न स्वातंत्र्यासाठी आंदोलन केली मराठवाड्यातील नागरिकांनी ध्यास घेतला व निजामी राजवट उलथवून स्वातंत्र्याची नवपहाट आणण्यासाठी शूर स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले.

त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेऊन एक मजबूत देश घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे संबोधित केले तसेच प्राचार्य डी.पी.पांडेय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमास शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनल सपकाळ तर आभार प्रसाद वानखेडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.