विज पडून ठार झालेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांची पूनम ताईने तात्काळ घेतली सात्वन पर भेट…..

255

 

 हानमंत चंदनकर

धर्माबाद शहरातील तहसील कार्यालयात आमदार राजेश पवार यांचा सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त जनता दरबार संपन्न होताच आमदार राजेश पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पुनम ताई पवार यांनी भर पावसात उमरीला एका अंतिम संस्काराला प्रयाण करणार होते. पण त्याच दरम्यान धर्माबाद शहरात महाराष्ट्र बस स्थानकाजवळ वीज पडून मौजे चिकना येतील इयत्ता नववीत शिकणारी शालेय विद्यार्थिनी कुमारी स्वाती कामाजी आवरे ठार झाल्याचे वृत्त समजताच सौ. पुनम ताई पवार यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात जाऊन सात्वन पर भेट घेतली. व उपस्थित नातलगांना धीर दिला. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रमेश अण्णा गौड, विजय पाटील डांगे, गोवर्धन पाटील, श्रीनिवास पाटील, बाजार समितीचे संचालक दत्ताहरी पाटील आवरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणू गोपाल पंडित आदींची उपस्थिती होती.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.