विष मुक्त भाजीपाला उत्पादन काळाची गरज–नासीर अली

24

 

 

नायगाव/ शेषेराव कंधारे 

रिलायन्स फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने आयोजित भाजीपाला उत्पादन कार्यशाळेत रिलायन्स फाउंडेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नासेर आली यांनी किनाळा येथील शेतकरयांना केंद्रिय भाजीपाला उत्पादनाबाबत माहिती देताना बदलत्या हवामानानुसार शेती करण्यास शेतकरी सज्ज झाला पाहिजे,कीमान रासायनिक खते,किमान पेसटीसाईडसचा वापर करुन शक्यतोवर सेंद्रीय भाजीपाला उत्पादन आपल्या कुटुंबांसाठी करावा व विषमुक्त भाजीपाला खावावे असे उद्गार या कार्यशाळेत काढले.

- Advertisement -

        गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी बचत गटातील महिला सह अनेक शेतकरी उपस्थित होते. किनाळा तालुका बिलोली येथील माधव गोविंदराव पा. भोसले यांच्या फार्म हाऊसवर ही कार्यशाळा दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाली.

रिलायनस फाउंडेशन नायगांव प्रतीनिधी मारोती वडडे यांनी आपल्या भागातील सामान्य शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती करता यावी या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन सहकार्याच्या भूमिकेतून शेतकऱ्यांना मदत करत असल्याने या मदतीचा शेतकऱ्यांनी योग्य फायदा घेऊन सेंद्रिय शेती करावे असे मत मांडून उपस्थित शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.