लंप्पी सदृश्य आजारामुळे कुंचेलीत चार जणावरांचा मृत्यू  तर पंधरा जनावरांवर उपचार सुरू.

संसर्गजन्य आजारामुळे पशुपालक चिंताग्रस्त.

3,831

 

नायगाव/शेषेराव कंधारे

नायगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच आता कुंचेली गावात जनावरांना लम्पी सारखा संसर्गजन्य आजार होवून चार जनावरे मरण पावली तर जवळपास पंधरा जणावरांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

पशुपालकात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून कुंचेली गावातील व परिसरातील जनावरांना लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पशुपालकातुन होत आहे.

कुंचेली ता.नायगाव येथे जवळपास पंधरा दिवसांपासून जनावरांना भरपूर ताप येणे, डोळ्यांतून व नाकातून पाण्याचा स्राव होणे, चारा तसेच पाणी कमी पिणे, दुध कमी होणे, पायावर सूज, लंगडणे तसेच अंगावर छोटया मोठया गाठी येणे असे आजार सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा दिवसांपासून पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवुन उपचार सुरू करण्यात आले, परंतु चार दिवसांपासून रोगाचा प्रार्दुभाव वेगाने वाढत असल्याने नारायण बावलगावे यांचें दोन गायी मरण पावले तर शेषेराव शिंपाळे आणि रमेश बावलगावे यांचें प्रत्येकी एक बैल मरण पावले तर जवळपास पंधरा जणावरांवर उपचार सुरू आहे त्यामुळे पशुपालकात भिंतीचे वातावरण निर्माण झाले असून उर्वरित गुरांच्या रोगाचा प्रार्दुभाव वेगाने पसरू नये यासाठी संबंधित अधिका-यांनी लवकरात लवकर  जनावराचे आरोग्य शिबीर घेऊन  आजारावर उपचार सुरू करण्यात यावी व मृत्यू पावलेल्या पशुपालकांना अर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

कुंचेली गावात जनावरांना संसर्गजन्य आजार बळावला आहे. काही जनावरचे रिपोर्टस तपासणीसाठी पाठवली आहेत ते रिपोर्ट्स ७२ तासात येतील तेव्हा आजार कोणता आहे हे स्पष्टपणे अधिकृत येईल तेव्हा सुरक्षेचा उपाय म्हणून प्रादुर्भाव झालेल्या गावांपासून ५ किलोमीटरच्या परिघात प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असून सर्वच जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.तोपर्यंत आमचे उपचारासाठी डॉक्टर मुक्कामी आहेत. लंम्पी संसर्गजन्य आजारांचा लवकर उपचार घेतल्यास लवकर बरा होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या जनावरांची काळजी घ्यावी असे डॉ.खिल्लारे पशुधन विस्तार अधिकारी, पं.स.नायगाव

Leave A Reply

Your email address will not be published.