सिंचन विहीर व गायगोठा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची मागणी करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा.

रोजगार हमी योजनेच्या अभियंत्यांचा प्रताप... लाभार्थ्याने दिला आत्मदहन करण्याचा इशारा.

459

 

नायगाव प्रतिनिधी -̊तानाजी शेळगावकर

महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर सिंचन विहिरी व जनावरांच्या संगोपनासाठी गायगोठा शासना मार्फत देण्यात येतं आहे त्यानुषंगाने सहा लाभार्थ्यांनी सिंचन विहिरीसाठी तर कांही लाभार्थ्यांनी गायगोठा साठी नायगाव पंचायत समिती मध्ये प्रस्ताव दाखल केले होते.

- Advertisement -

नायगाव तालुक्यातील गडगा ग्रामपंचायत कार्यालय मार्फत महारष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामासाठी  सिंचन विहीर , गायगोठा वैक्तिक मागणीसाठी दिनांक ३१ जानेवारी २०२२ ते १६ फेब्रुवारी २०२२ रोजी शांताबाई मारोती भाकरे , संजय मोहनराव भाकरे , संदीप संभाजी बोरीवाले , वंदना बालाजी अंचीतवार , माधव मारोती ईटकापल्ले, रामदास दिगंबर भाकरे , या सहा लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरी व गायगोठा चे प्रस्ताव गडगा ग्रामपंचायत अंतर्गत काम पाहणारे कंत्राटी जे.ई. शेख मैनोदिन यांच्याकडे सादर केले.

सदरचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रत्यकी  तीन हजार रुपये प्रमाणे मागणी करीत आहेत त्यांना आम्ही ती रक्कम न दिल्याने कंत्राटी जेई यांनी सदरच्या फायली ऑनलाईन न करता गेल्या सहा महिन्यापासून पेंडीग ठेवल्या असल्याने त्यांना विचारणा केले असता कंत्राटी जेई यांनी प्रत्यकी प्रस्तावासाठी मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपये ठरल्या प्रमाणे द्यावे लागतील तेंव्हा फायली मंजूर होतील असे लाभार्थ्यांना म्हंटले आहे.

सदर प्रकरणी गटविकास अधिकारी यांना तोंडी माहिती दिली असता त्यांनी सबंधित जेई यांना कारवाही साठी सुचना देऊनही होती मात्र कांहीही फरक पडला नसल्याने अखेर गडगा येथील रामदास दिगंबर भाकरे यांनी दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी गटविकास अधिकारी ,जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड ,पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड ,पोलीस ठाणे नायगाव ,जिल्हा परिषद मनरेगा विभाग नांदेड याना माहितीस्तव प्रतिलिपी सादर केले आहेत.

 सबंधित रोजगार हमी योजनेच्या अभियंत्याला निलंबित नाही केल्यास स्वता अंगावर पेट्रोल टाकून आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

 

सदरील घटनेमुळे नायगांव पंचायत समिती स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत..सदरील प्रकरणी लाभार्थ्यांना न्याय मिळेल की नाही हे पाहणे आवस्तुक्याचे ठरेल…..

Leave A Reply

Your email address will not be published.