विषय शिक्षकांच्या मागणी साठी मांजरम जि.प.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी पटांगणात मांडला ठिया.

286

 

 

नायगाव प्रतिनिधी – तानाजी शेळगावकर

विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांन चे प्रचंड शेक्षनिक नुकसान होत आहे.या गंभिर विषयाकडे प्रशासन म्हणावे तसे लक्ष देत नसल्याने विषय शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावा,या मागणी साठी मांजरम येथील जि.प. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी १३सप्टेंबर रोजी पटांगणात ठिय्या मांडला.

- Advertisement -

मांजरम जि.प.शाळेत मराठी इतिहास भूगोल विषयासाठी शिक्षक नसल्याने मांजरम जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून हा विषय शिकवल्या जात नाही.ही बाब अनेक वेळा मागणी करून पूर्ण होत नसल्याने दि.13 सप्टेंबर रोजी जागरूक पालक गावातील तरुण वर्ग यांनी व विद्यार्थीनी दि.13 सप्टेंबर सकाळी प्रतिज्ञा झाल्यावर वर्गात जाण्यास नकार दिला.

   शाळेतील रिक्त जागा तात्काळ भरा म्हणत तरुणांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्याने वातावरण गंभीर झाले होते.विषय शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्या , अन्यथा शाळेला कुलूप घालण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शाळेची प्रतिज्ञा झाली वर्गात जाण्याच्या सुचना शिक्षकांनी दिली परंतु विद्यार्थ्यांनी मैदानात जागेवर बसून ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली शिक्षक द्या …शिक्षक द्या…. विषय शिक्षक नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून मराठी इतिहास भूगोल विषयाचा एक ही धडा शिकवला नाही दहावीच्या परीक्षेत काय लिहावे असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

मांजरम जिल्हा परिषद हायस्कूल येथे पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून चारशे सदोतीस( ४३७ ) विद्यार्थी सध्या शाळेत शिक्षण घेत आहेत.जिल्ह्यात नामांकित असलेल्या शाळेत सध्या माध्यमिक शिक्षक एक, विषय शिक्षक चार, प्राथमिक शिक्षण एक, कनिष्ठ सहाय्यक एक, परिचर एक असे एकूण आठ पद रिक्त आहेत.

मराठी विषयांचे माध्यमिक शिक्षक हे सेवा निवृत्त झाल्याने ही जागा रिक्त झाली. ती जागा भरण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्र व्यवहार केला परंतु त्याचा फायदा झाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शालीय व्यवस्थापन समितीने लवकरच रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा परिषद कडे जावून मागणी कराणार असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, उप सरपंच प्रतिनिधी हणमंत शिंदे, मधूकर शिंदे शाळेतील शिक्षक यांनी विद्यार्थ्यांची समज काढून विद्यार्थ्यांना वर्गात पाठवले.

Leave A Reply

Your email address will not be published.