नीट परीक्षेत उज्वल यश मिळविलेल्या श्री साईबाबा उच्च माध्यमिक विद्यालयातील चैतन्य गाडेगावकरचा मा.खा.भास्करराव पा.खतगावकरांच्या हस्ते गौरव.

184

 

नायगाव – शेषेराव कंधारे

नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये शंकरनगर येथील श्री साईबाबा उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी चैतन्य राजेश गाडेगावकर यांने ७२० पैकी ६०० गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवुन गौरव करण्यात आला.

- Advertisement -

शंकरनगर ता.बिलोली येथील माळरानावर जिल्ह्याचे लोकप्रिय मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी येथील गोरगरीब दीनदलित जनतेच्या मुलांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शिक्षण रुपी नंदवन फुलवलेल्या श्री साईबाबा उच्च माध्यमिक विद्यालयातील कष्टाळू व मेहनती शिक्षकांच्या परिश्रमातून याचं शाळेतील शिक्षक राजेश गाडेगावकर यांचा मुलगा चैतन्य राजेश गाडेगावकर हा नुकत्याच झालेल्या नीट २०२२ परिक्षीत ७२० पैकी ६०० गुण घेऊन वैद्यकीय (M.B.B.S.) प्रवेशासाठी पात्र झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी खतगावकरांच्या हस्ते चैतन्य गाडेगावकरचा शाल पुष्पगुच्छ व पेढा भरवुन गौरव करण्यात आला.

यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, संस्थेच्या सचिव डॉ सौ.मिनलताई खतगावकर, मुख्याध्यापक धनंजय शेळके सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रपरिवार अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.