अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून शेतकरी, कष्टकरी, पीडित व शोषित यांचे प्रश्न मांडून त्यांना वाचा फोडण्याचे काम लेखनितुन केले – सचिनभाऊ साठे

809

 

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेनी आपल्या साहित्यातून शेतकरी, कष्टकरी, पीडित व शोषित यांचे प्रश्न मांडून त्यांना वाचा फोडण्याचे काम लेखनितुन केले आहे म्हणून या जगातील २७ देशातील साहित्यिकांचा गौरव होताना आज दिसतोय म्हणून महाराष्ट्र शासनाने अण्णा भाऊ साठेचा जो रशिया मध्ये पुतळा बसतोय त्यांचा अभिनंदनाचा ठराव आपल्या राज्याच्या विधानसभेत सत्तेत असलेल्या लोकांनी घेतला आहे त्यामुळे त्यांचें आभार मानतो आणि येणाऱ्या काळात आदर्श शेळगाव गौरींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन आणण्यासाठी पाठपुरावा करु व येथील कर्तव्य दक्ष सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे उद्घाटक आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांनी काढले.

- Advertisement -

      शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने इतर खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात येतो त्यांचाच वारसा जोपासण्याचे काम येथील सरपंच तथा प्राचार्य मनोहर तोटरे यांनी नायगाव तालुक्यातील आदर्श शेळगाव गौरी येथे दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध रोगांचे तज्ञ डॉ बोलुन निःशुल्क महाआरोग्य शिबीर व मोफत औषधी वाटपाचे आयोजन करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे हे होते तर अध्यक्ष म्हणून शेळगाव गौरींचे सरपंच प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे हे होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे, तलाठी विजय पाटील जाधव, माधवराव कंधारे,प्रा.प्रकाशराव चोंडीकर, डॉ. बळीराम बोडके, डॉ.नितीन पाईकवार, डॉ सुमित्रा पाईकराव, डॉ.खंडागळे, डॉ.किरण ठाकरे, आनंदराव पाटील बावणे, गोविंद पा डाकोरे,जगनाथ पा.बावणे, डॉ.रामराव श्रीरामे , डॉ.सतीष ढुमणे, डॉ.मातृड मलगिलवार, डॉ.अभय कोटगीरे, देविदास राठोड, दिलीप पा.पांढरे, सुनिल रामदासी, देविदास राठोड, संतोष देशमुख, सह आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आरंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

येथील सरपंच तथा प्राचार्य डॉ मनोहर तोटरे व जयंती मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांनी केले.

महामानवांना केवळ डोक्यावर घेऊन चालणार नाही तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन वाटचाल केली तरच विकास होईल असे मत सपोनि संकेत दिघे यांनी केले.

आदर्श शेळगाव गौरींच्या विकासासाठी जातीपातीचे राजकारण बाजूला सारून सर्वांचे समाजातील नागरीक एकत्र येऊन काम करतात त्यामुळेच या गावांचे नाव राज्यस्तरावर पोहोचले आहे आणि येथील सर्वसामान्य जनतेला छोट्या मोठ्या आजारासाठी जिल्हा तालुका स्तरावर परवडत नाही म्हणून मी दरवर्षी अण्णांच्या जयंती निमित्त इतरत्र वायफळ खर्च न करता सामज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आणि यावर्षी तज्ञ डॉक्टरांना बोलवुन महाआरोग्य शिबिर व मोफत औषधीचे वाटपाचा कार्यक्रम येथील जयंती मंडळांनी परिश्रम घेतले त्या सर्व मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे मत अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ मनोहर तोटरे यांनी केले.

या आरोग्य शिबीरात बालरोग व नवजात शिशु रोग,मधुमेह, र्‍हदयरोग, पॅरालिसीस, विषबाधा सर्पदंश,ऑर्थो अस्थिरोग,सांधे , मणक्याचे,कान, नाक, घसा , कॅन्सर,स्त्रीरोग ,प्रसुतीशास्त्र,नेत्ररोगशास्त्र तज्ञ एम.बी.बी.एस डॉक्टर उपस्थित राहून शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नागनाथ वाढवणे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ मनोहर तोटरे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष कोंडीबा इंगळे, उपाध्यक्ष शिवाजी घोरपडे, सचिव तानाजी शेळगावकर, सहसचिव शिवलिंग वाघमारे, गंगाधर वाघमारे. साईनाथ घोरपडे, शिवराज घोरपडे. चंद्रकांत घोरपडे. राजू गवाले, शिवराज वाघमारे, दिपक इंगले, धनराज घोरपडे. शाहाजी वाघमारे, उत्तम वाघमारे. संदीप घोरपडे, दयानंद वाघमारे, साईनाथ घोरपडे सह आदींनी परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.