पल्सर टाटा सुमोच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी.

1,435

 

 

नायगाव तालुका प्रतिनिधि अंकुशकुमार देगांवकर 

 

नायगाव तालुक्यातील औराळा येथील दोन तरूण मुलाचा मुखेड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला जात असताना समोरा समोर अपघात होऊन एक मुलगा जागीच ठार झाला आहे.

- Advertisement -

मृत दिपक जेजेराव पवार अंदाजे वय 21 वर्ष असून भारतीय सैन्यदलात दोन वर्षापासून तयारी करत होता घरची परिस्थिती अतिशय गरीब  होती व  तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता तिन बहीणी  आई वडील हे मजूरी करून आपल्या मुलाचे पोट भरत होते

तो मुखेड येथे मातंग परिषेदेला कार्यक्रमासाठी  जात असताना त्याचा दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला आहे तर दुसरी व्यक्ती   अंनदा पवार असून अंदाजे वय हे 24 वर्ष असून गंभीर जखमी आहे

अत्यंत दुखत घटना  घडली असून संबंध  औराळा  गाव हे या घटनेमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. मयत व्यक्ती हा काही दिवसा अगोदर सैन्यदलातली परिक्षा देऊन आला होता बजाज कंपनीची पल्सर असून मोटारसायकल नंबर MH 26 CB 6554 व समोरा समोर गाडी ची धडक झाली असून समोर ची गाडी ही टाटा कंपनीची सुमो MH 29 AD 4180 आहे हा अपघात नायगाव तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.