मराठवाडा शिक्षक संघाची नायगांव तालुका कार्यकारणीची जाहीर. 

तालुकाध्यक्षपदी माने वसंत आणि सचिव पदी कोंडावार एल.डी.

231

 

 

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्‍नावार )

दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी यमुनाबाई भाऊराव पाटील हायस्कूल नायगांव येथे मराठवाडा शिक्षक संघाची नायगांव तालुक्यातील शिक्षकांची बैठक माजी जिल्हाध्यक्ष बोमनाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव सर,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार सर,केंद्रीय कार्यकारणी सदस्य ई.डी.पाटोदेकर सर ,माजी शिक्षण विस्ताराधिकारी विश्वासराव सर साहित्यिक पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगांव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

नायगांव तालुका कार्यकारणी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांच्या संमत्तीने खालील प्रमाणे निवड करण्यात आली.

1) तालुकाध्यक्षः वसंत शंकरराव माने (जनता हायस्कूल नायगांव)

2) तालुका सचिव : कोंडावार एल.डी. (पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर देगाव)

3) तालुका कार्याध्यक्ष : कल्याण सर (श्री दत्त माध्यमिक विद्यालय नायगांव)

4) ता. उपाध्यक्ष : श्री आब्दागिरे सर (शंकर नगर)

5) ता.उपाध्यक्ष : श्री तिप्पलवाड एन. एम. (जवाहरलाल नेहरू विद्यालय बरवाडा)

6) ता.उपाध्यक्ष : श्री सालेगाये एम. आर. (श्री शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी)

7) सहसचिव : श्री नागनाथ चोंडे नाथोबा विद्यालय गडगा)

8) सहसचिव : श्री पाटील व्ही. एम. (ज्युनि. कॉलेज कुंटूर तांडा)यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी मागच्या वेळी तालुक्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे श्री बडूरे

जी.पी.यांची जिल्हाउपाध्यक्ष पदी तर श्री वडवळे एच.बी. यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली.

          मराठवाडा शिक्षक संघाचे प्रांत अध्यक्ष विश्वासराव सर,जिल्हाध्यक्ष चिलवरवार सर व पाटोदेकर सर यांनी नवनियुक्त सर्व पदाधिका-यांना शुभेच्छा देऊन संघटना बळकट करण्याचे आव्हान केले.

यावेळी संघटनेचे नूतन पदाधिका-यांनी संघटना मजबूत करून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.याप्रसंगी अनेक शिक्षक बांधव, उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.