गंगनबीड महादेवाच्या दर्शनासाठी तब्बल एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा.

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलांचे पर्स व पुरुषांचे पाकीट हातोहात मारले भाविकांच्या गर्दीमुळे गंगनबीड महादेवांला वाहतुकीची कोंडी

434

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

पुरातन कालीन शिंगणापूर महादेव प्रतिरुप असलेल्या नायगाव तालुक्यातील गंगनबीड महादेव मंदिरात दि.२२ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी पहाटे पासून लांबचं लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे पासुन तर सायकांळी सहा वाजेपर्यंत रस्त्याने व मंदिरात भाविकांची गर्दीच गर्दी असल्याने या गर्दीत पाकीट मारांनी आपले हात साफ केल्याने या पाकीट माराचा अनेकांना फटका बसला .

- Advertisement -

श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार असल्याने पहाटेपासून गंगनबीड महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरु झाला. दुपारी तर महादेव मंदिराच्या मुख्य व्दारा पासुन महादेव मंदिराच्या पायथ्या पर्यंत संपूर्ण रस्ता वाहनाने दोन्ही बाजूंनी फुल्ल झाले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइट पट्या न भरल्याने वाहनांना पार्किंग कडे जाता न आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असल्याचे वाहनधारकातुन बोलल्या जात होते. ‌

तब्बल एक किलोमीट अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या ब-याच वेळेनंतरही वाहतुककोंडी सुटत नसल्याचे पाहून भाविकांनी पायपीट सुरु केली. शर्थीच्या प्रयत्नांनी मंदिर गाठल्याचा आनंदही क्षणिक ठरला.मंदिराबाहेर भाविकांच्या गदीर्ने परीसर व्यापले होते. दर्शनकोंडी पाहून वृद्ध भाविकांचाही नाइलाज झाला आणि महादेवाचे बाहेरुनच दर्शन घेऊन शेकडो भाविकांना समाधान मानावे लागले. वाहतुककोंडीने वाहनांना परतीचा प्रवासही अशक्य बनला. तेव्हा भाविकांनी गाडीत बसूनच वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा करत ताटकळत बसावे लागले. त्यानंतरही कुंटुर व नायगाव पोलिस ठाण्याचे काही पोलिस कर्मचारी येऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे काही वेळाने भाविकांना वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडता आले.तो पर्यंत मात्र भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या शिंगणापूर महादेव प्रतिरूप समजले जाणा-या गंगनबीड येथील मंदिरात रात्री बारा वाजे पासुन महादेवाचा अभिषेकाला सुरूवात झाली . देवस्थानाचा कायापालट व जिर्णोद्धार तालुक्याचे भाग्यविधाते कै बळवंतरावजी चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह प्रमुख प्रतिनिधीच्या प्रयत्नातून करण्यात आला.

गंगनबीड महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी मंदिराला जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात याव व मंदिराच्या पायथ्याशी वाहनांना उभे करण्यासाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाविक भक्तांनी केली आहे.

आलेल्या भाविकांचे अभिषेक येथील महाराज भागवत अप्पा स्वामी ,गंगाधर भागवत स्वामी ,उमाकांत महाराज स्वामी यांनी मंदीरात हजर होते तर आलेल्या भाविकाला दर्शन झाल्यावर पुढे पाठविण्यासाठी बालाजी माऊली यांनी परिश्रम घेतले . श्रावण मासातील अखेरच्या सोमवारी गंगंणबिड येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जवळपास पंचवीस हजारच्या वर भाविकांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.