कै.प्रदीप धोंडिबा पाटील यांची गावतिढा कादंबरी प्रकाशीत.

167

 

——————————–‌————-

नरसीफाटा/शेषेराव कंधारे

- Advertisement -

कामरसपल्ली येथील कै. प्रदीप धोंडीबा पाटील यांची मरणोत्तर गावतिढा ही कादंबरी पुणे येथील संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार यांनी प्रकाशित केली आहे. कादंबरीचे लेखन प्रदीप पाटील यांनी 2020 मध्ये पुर्ण केले होते. पण कादंबरी प्रकाशन होण्या अगोदरच कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात त्यांनाही कोरोनाची लागण झाली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्यांनी दि.10 एप्रिल 2021 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

आज तब्बल दीड वर्ष झाले त्यांना जाऊन. पण नुकतीच त्यांची गावतिढा ही कादंबरी संस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केली.

         कादंबरी प्रकाशित झाले याचा खूप आनंद आहे. पण त्यांच्या डोळ्यासमोर जी कादंबरी प्रकाशित व्हायला पाहिजे होती ती आज त्यांच्या नंतर प्रकाशित झाली याचं शल्य मनात आहेच .संदर्भ शोधताना , होरपळ आणि गावकळा ही पुस्तके त्यांची यापूर्वी प्रकाशित झाले होती या पुस्तकांना अनेक राज्यस्तरीय प्रतिष्ठेचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

त्यांच्या साहित्यात ग्रामीण भागातील प्रश्न सातत्याने यायचे. शेती आणि शेतकरी, समस्यांचे निराकरण, शोषणाविरूध्द लढा आणि गावमातीचे ज्वलंतपण त्यांनी कथा कादंबरी मधून उजागर केले आहे. यानिमित्ताने संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार यांचे अभिनंदन होत आहेत.प्रदीप पाटील यांचे बंधू दिपक पाटील यांनी वाळुची शेती, नामुष्कीचे सोबती ह्या दोन अप्रकाशित कादंब-या प्रकाशित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.