श्रावण मासनिमित किनाळा महादेव मंदिरात लिलामृत ग्रंथाचे एकदिवसीय पारायण संपन्न.

269

 

नरसीफाटा / शेषेराव कंधारे

अनंतश्री विभूषित जगतगुरू रामानंदाचार्य श्री.स्वामी नरेंद्राचार्य महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कुपा आशीर्वादाने नायगाव तालुका श्री. संप्रदाय सेवा कमिटीच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्ताने जगतगुरू श्रीच्या हस्तलिखित श्री.लिलामृत ग्रंथाचे सामोहीक एकदिवसीय महापरायण गुरुवारी सकाळी पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिलोली तालुक्यातील किनाळा महादेव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आले.

- Advertisement -

         नांदेड जिल्हा समितीच्या मार्गदर्शनाखाली नायगाव व बिलोली तालुका श्री. संप्रदाय सेवा कमिटीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमा बरोबरच श्रावण महिन्यानिमित्ताने जगद्गुरूश्रीच्या हस्तलिखित श्री.लिलामृत ग्रंथाचे एकदिवसीय महापरायण गुरुवारी नायगाव शहरात व किनाळा येथे जगतगुरू श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुरुबंधु व गुरुभगिंनी आपआपल्या पोशाखात शिस्तीत मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यांत आला . या सामुहिक पारायणात सतर च्या वर गुरुबंधू व गुरुभगिंनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन श्री.लिलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले. यावेळी वाचक म्हणून दिपीका पांचाळ, सुनिता कंधारे होते. यावेळी गणि गण गणात बोते च्या नाम गजरात तलिन झाले होते. 

यावेळी मराठवाडा ब्रिगेटीय प्रमुख काशिनाथ गोपशेटवार, जिल्हा कर्नल भागना, उपजिल्हा कर्नल शिवाजी पाटील, बालाजी पाटील भोसले, शंकर पा वाघमारे, माधवराव भत्ते,भोकसखेडे, शंकर गजलवाड यांची उपस्थिती होती. सांगता आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.