जिल्हावार्ताताज्या बातम्यानांदेड

नायगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस शेती पिकांचे अतोनात नुकसान.


 

नायगाव प्रतिनिधी – अंकुश गायकवाड

नायगाव  तालुक्यातील परिसरात सायंकाळीं पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आल्याने  अनेक गावाचा संपर्क तुटला असून देगाव येथील शेतकऱ्याचे चार जनावरे वाहून गेली असल्याचे तहसील कार्यालया मार्फत कळवण्यात आले आहे.

सायकाळी साडेतीन च्या दरम्यान पावसाने परिसरात रौद्र रूप धारण केले बघता बघता सगळीकडे पाणीच पाणी झाले. नदी ना पूर आला. तालुक्यातील पळस गाव, टाकळगाव, ताकबीड, देगाव आदी गावांचा संपर्क तुटला. नाल्यानी रौद्र रूप धारण केल्याने शाळकरी मुले गावाकडे जायची अडकून पडली होती. या परिसरात नागरिक  पुल बाधून देण्याची मागणी  शासनाकडे करतात परंतू संबधित यंत्रणेला आज पर्यंत जाग आली नाही, एखाद्याचा जीव गेल्यावरच शासनाला जाग येणार का? असा प्रश्न परिसरातील नागरीक करत आहेत.

     देगाव येथील शेतकरी व्यंकट मोरे हे वाहून जात असताना झाडाचा आधार घेऊन झाडावर थांबले त्यावेळी गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी, त्या शेतकऱ्याचे चार जनावरे पुरात वाहून गेले असल्याचे तहसील कार्यालया मार्फत सांगण्यात आले. शेतकऱ्यांने गावकऱ्यांचे आभार मानले व सुटकेचा निःश्वास सोडला.

तालुक्यात झालेल्या ढग फुटी पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तर पळसगाव येथील शेतकरी जुंने यांच्या घराभोवती पाण्याने वेढा दिला असल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यात गेले आहे. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

 

आपत्ती व्यवस्थापन पथक बघ्याच्या भूमिकेत.

 देगाव येथील शेतकरी वाहून जाऊन झाडावर बसला त्याची खबर तहसील कार्यालयाला देण्यात आली मात्र अर्ध्या तासाने मंडळ अधिकाऱ्याचे पथक आले खरे मात्र त्यांच्याकडे कुठलेच साहित्य नसल्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली त्यावेळेस गावकऱ्यांनी तत्परता दाखवून ट्रॅक्टर ला दोरी बांधून शेतकऱ्याची सुटका केली. जवळ पास पाऊण तास अडकलेला शेतकऱ्यानी सुटकेचा निःश्वास सोडला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »