कार्यमग्न व्यक्तीमत्व:संजय पाटील शेळगावकर।।

वाढदिवस विशेष.....

210

 

विद्यार्थी आपल्या स्वतःच्या कल्याणाकरिता दक्ष असावयास हवा, हा मूलमंत्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देत त्यांच्यासाठी अहोरात्र धडपडणारे प्राचार्य म्हणून ज्यांचा लौकिक आहे असे विद्यार्थी प्रिय प्राचार्य संजय पाटील शेळगावकर, जिद्द आणि कर्तव्याच्या जोरावर त्यांचा प्रवास असामान्य व्यक्तीमत्वात होत गेला त्यांचा अाज वाढदिवस. काही माणसे इतकी मोठी असतात की, त्यांचे मोठेपण अनुभवावेच लागते आणि  अशी माणसे संपर्कात असल्याशिवाय त्यांचे मोठेपण कळत नाही, त्यापैकी एक म्हणजे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर. अत्यंत तल्लख बुद्धीमत्ता हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विशेष पैलू आहे. साधीसुधी राहणी, उच्च विचार सरणी, चेहऱ्यावर प्रचंड हास्य, पाहताक्षणी अापलसं करणारं व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांचा जन्म ३अगस्ट १९७४ रोजी एका शेतकरी कुटुंबात सौ. चंद्रकलाबाई व महाराष्ट्राचे स्वछता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांच्या पोटी झाला. जनतेची दु:ख जपणारा, सत्यासाठी धडपडणारा, जनहिताची वकिली करणारा, कार्यमग्न, शिक्षणप्रेमी, समाजकारणी, संवेदनशील, धुरंधर, उमदे व्यक्तीमत्व, वक्तशीर, निर्व्यसनी अशा व्यक्तीची खरच आज समाजाला गरज अत्यंत आहे. संत गाडगेबाबा ग्रामीण स्वछता समिती महाराष्ट्र राज्याचे प्रथम अध्यक्ष मा. माधवराव पाटील शेळगावकर यांच्या तालमीत समाजसेवेचे व्रत हाती घेताना स्वछता, पर्यावरण, अस्पृश्यांना निर्मुलन, स्त्री पुरुष समानता याबाबत उच्च कोटींची कामे केल्याने शेळगाव(गौरी) ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, यांचे सर्व श्रेय ग्रामस्थांना जाते असे ते नि संदिग्धीकरणपणे सांगतात. पक्षाने किंवा समाजाने एखादी जबाबदारी दिल्यास ती तितक्याच तत्परतेने स्विकारतात व कोणतीही अडचण न सांगता पूर्ण करतात.
काॅपीयुक्त शिक्षणाने मुले पंगू बनत आहेत हे ओळखून त्यांनी तत्कालीन माननीय जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव या नात्याने काॅपीमुक्त अभियान सुरू केले व यशस्वीही झाले, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्य काॅपीमुक्त झाले, ही बाब नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेली, समाज सेवा करीत असताना प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून तालुक्यातील व मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात.

- Advertisement -

काही माणसे आपण समाजाचे काही देणे लागतो हा भाव उराशी बाळगून काम करतात, केवळ सकारात्मक विचार सरणी मुळे स्वत:स्वछंदी राहून इतरांना अनंद देतात. वयाचे भान पदाचा गर्व न बाळगता समोरच्या माणसात मिसळतात, म्हणूनच सदैव कार्यमग्न रहातात. अशा धुंदीत जीवन व्यतीत करणार्याच्या यादीत प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, मग सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, स्वछता इतर कोणतेही काम असो पुढाकार असणारच अाहे, जे काही करायचे ते मनातून करायचे, असा सकारात्मक दृष्टीकोन असल्यानेच तळागाळातील जनतेचा प्रतिसाद मिळतो अाहे.

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना वैचारिक शिदोरी पुरविण्यासाठी अनेक विचारवंतांना शाळेत पाचारण करून प्रबोधन पर उपक्रम राबवले जातात, ख-या अर्थाने विध्यार्थी, गुणवंत, ज्ञानवंत, कीर्तीवंत व शीलवंत व्हावा यासाठी त्यांची सततची धडपड असते म्हणूनच की काय संस्थेतून उच्चविद्याविभूषित विद्यार्थी घडले जात अाहेत हे सत्य नाकारता येत नाही अर्थात हे सर्व होण्यासाठी कुटुंबातील सदस्य, अाई-बाबांचे, शिक्षक व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सरोज ताई शेळगावकर यांचेही सहकार्य तेवढेच मोलाचे आहे.

प्राचार्य, शिक्षण मंडळाचे सचिव, तालुका बाजार समितीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, पतपेढीचे अध्यक्ष व पंचायत समितीचे उपसभापती इत्यादी विविध पदांवर काम करताना कधी गर्व केला नाही, कार्यमग्न व्यक्तीमत्व म्हणून त्यांची खास ओळख आहे, विविध क्षेत्रातील योगदान हे त्यांच्या उत्साही व्यक्तीमत्वाचे गमक आहे, सुसंस्काराची पेरणी करणारा, अदर्श चारित्र्यसंपन्न व्यक्तीने आज ४९व्या वर्षात पदार्पण केले आहे, त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी व निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा………

ज्ञान संवर्धन मंडळ धुप्पा ता.नायगाव जि.नांदेड

Leave A Reply

Your email address will not be published.