युवकांच्या परिश्रमातून महाराष्ट्रातील गुणवत्तेचे दर्शन घडते – उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा

1,083

 

 

नरसीफाटा/ शेषेराव कंधारे

देशात अन्य राजांच्या तुलनेत महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले असंख्य विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपली छाप निर्माण करीत आहेत.

- Advertisement -

    शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांची मुले परिश्रमाने उच्च पदापर्यंत पोहोंचत आहेत. जीवनाच्या सर्व स्तरावर महाराष्ट्रीयन युवक आपल्या प्रतिभेने स्थान प्राप्त करीत आहेत. यातून महाराष्ट्रातील व्यापक गुणवत्तेचे दर्शन घडते. असे प्रतिपादन देगलूरच्या उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.

त्या शंकरनगर ता. बिलोली येथील श्री भास्करराव पाटील खतगावकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. दि. 2 ऑगस्ट रोजी शंकरनगर येथील श्री भास्करराव पाटील खतगावकर कनिष्ठ महाविद्यालयात (इंग्रजी माध्यम) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ. मीनलताई पाटील खतगावकर उपस्थित होत्या. उद्घाटक म्हणून देगलूरच्या उपजिल्हाधिकारी उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर नवोदय प्रवेश परीक्षा, एनटीएस स्पर्धा परीक्षेसह इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या श्रुती शेळके,प्रणव होलगरे, ऋषिकेश वाघमारे, दिव्या खराडे, तर इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत गुनानुक्रमे सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या अनुजा इंगळे, भक्ती मेहेत्रे, साक्षी पाटील, अक्षय ढोकळे, स्काऊट गाईडमध्ये राज्यस्तरीय पातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या प्रणव होलगरे, यादव भिसे, विशाल खोकले, स्मायली गेडाम, रेणुका वानखडे, विकास कोकाटे, मारोती खिल्लारे या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा सादर करून विविध क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना नृसिंह सूतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब पाटील खतगावकर यांनी उच्च गुणवत्ता निर्माण करून ती सातत्याने टिकून ठेवल्यामुळे प्राचार्य पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेच्या सचिव डॉ. मीनलताई पाटील खतगावकर म्हणाल्या की, बिलोली- देगलूर सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडणारे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या प्रेरणेने आणि माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनातून गोदावरी मनावर पब्लिक स्कूलची स्थापना करण्यात आली. या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे आता श्री भास्करराव पाटील भास्करराव बापूराव पाटील खतगावकर कनिष्ठ महाविद्यालय असे करण्यात आले आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाने गेल्या वीस- पंचवीस वर्षापासून गुणवत्तेची उत्कृष्ट परंपरा अबाधित ठेवली आहे. स्वर्गीय मधुकरराव पाटील दादांची प्रेरणा, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे विद्यालयाची गुणवत्ता वाढली आहे. त्यामुळेच कनिष्ठ महाविद्यालयाचे नामांकित इंग्रजी माध्यमाचे विद्यालय म्हणून निवड झाली आहे. समाजाच्या विविध स्तरातील जवळपास दोन हजारावर विद्यार्थी सध्या येथे शिक्षण घेत आहेत. याप्रसंगी डॉ. मीनलताई यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणापासून झोपण्यापर्यंत पालकांसारखी काळजी घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी बिलोलीचे उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीकांत निळे, बिलोलीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, देगलूरचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख, रवी पाटील खतगावकर, आनंदराव बिराजदार, प्राचार्य बी. एस. पिंपळे, मुख्याध्यापक धनंजय शेळके, धोंडीबा वडजे, चंद्रकांत देवारे, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि दिघे, हनुमंतराव तोडे, संतोष पुयड, माधवराव कंधारे, प्रा. शिवाजी पाटील, सरपंच शिवाजी डोंगरे, सरपंच मारुती हेंटे, डॉ. कासराळीकर, सदाशिव पाटील डाकोरे, माजी उपसभापती शंकर व्यंकम, माधवराव वाघमारे, सरपंच विठ्ठल माने, अंबादास शिनगारे, सरपंच कोकणे, जयवंत गायकवाड,माधव पा. भोसले, नागेश मोहिते यांच्यासह रामतीर्थ,किनाळा,हिप्परगा माळ, बिजूर, कामरसपल्ली, केरूर, अटकळी, आदमपूर, टाकळी, खतगाव, बडूर, अजनी, बामणी, डोणगाव, पाचपिपळी, लोहगाव, कासराळी सह बिलोली तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक,पालक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्मिला कदम- तोडे यांनी केले. वंदेमातरम् गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.