श्री.भास्करराव पा.खतगावकर पब्लिक स्कूल शंकरनगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण.

177

 

नायगाव / शेषेराव कंधारे

 

गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट संचलित श्री.भास्कराव बापुराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेज शंकरनगर च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आज दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शाळेच्या मैदानात करण्यात येणार असून सदरील कार्यक्रमास उपस्थित राहुन गुणवंत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावे असे आवाहन प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय यांनी केले आहे.

- Advertisement -

           शंकरनगर येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या श्री.भास्करराव बापुराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक क्षेञात उल्लेखनीय कामगिरी बजावत ग्रामीण भागातील नागरीकांना कलेच्या क्षेञात आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर व सचिव डॉ मिनल पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय यांनी दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम व अनेक दर्जेदार कार्यक्रम आयोजित करीत असतात यंदा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा देगलूर उपविभागीय अधिकारी सौ.सौम्या शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट प्रकल्प अधिकारी किर्तीकिरण पुजार, सहायक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा प्रकल्प अधिकारी विवेक जाॅन्सन ह्या तिन आय.एस.आय.आधिका-याचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थीना ऐकायला मिळणार आहे .

दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भास्करराव बापुराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल येथे २०२२ मध्ये दहावी बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शाळेच्या मैदानात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ.मिनल पाटील खतगावकर हे आहेत तर उदघाटक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा देगलूर उपविभागीय अधिकारी सौ.सौम्या शर्मा व सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट प्रकल्प अधिकारी किर्तीकिरण पुजार आहेत तर विशेष अतिथी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा पांढरकवडा प्रकल्प अधिकारी विवेक जाॅन्सन, उपस्थीत राहणार आहेत.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बिलोली उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, नांदेड सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी डॉ.तेजेश माळवतकर,कळमनुरी प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे,पुसद प्रकल्प अधिकारी ए.यु.धाबे,बिलोली तहसीलदार श्रीकांत निळे,देगलूर तहसीलदार राजाभाऊ कदम,बिलोली गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, खानापूर नृसिंह सहकारी सुतगिरणीचे चेअरमन बाळासाहेब पाटील खतगावकर,देगलुर गटविकास अधिकारी शेखर देशमुख,बिलोली गटशिक्षणाधिकारी अधिकारी बी.एम.पाटील, रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे सह आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहुन गुणवंत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावे असे आवाहन प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.