मांजरम जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी प्रकाश शिवारेड्डी यांच्या नावाची चर्चा !!
नांदेड एक्स्प्रेस न्यूज नेटवर्क:-
दि. २८ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाली असून आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर विविध जिल्हा परिषद गटांत संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चा मतदारांत रंगल्या आहेत.
मांजरम जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) जाहीर झाल्यानंतर मांजरमचे माजी सरपंच प्रकाश शिवारेड्डी यांच्या नावाची जोरदार चर्चा मांजरम परिसरातील मतदांरात रंगली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शिवारेड्डी यांनी गेल्या पंचवार्षिकात मांजरम ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सरपंच पदाचा कार्यभार अतिशय उल्लेखनीय पद्धतीने निभावला होतो. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव ही त्याची विशेष ओळख असुन संयमी, सुशिक्षित आणि विकासाभीमुख नैतृव अशी त्यांची सामाजिक प्रतीमा आहे.
त्यामुळे मांजरम जिल्हा परिषद गटात प्रकाश शिवारेड्डी यांच्या नावची जोरदार चर्चा होतांना दिसून येत आहे. ऐनवेळी बाहेरून आयात उमेदार आणून तो आमच्यावर लादण्यापैक्षा आम्हाला आमच्यातील उमेदवार हवा आहे याचाही विचार राजकीय पक्षांनी करावा अशीही भावना सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.