नायगाव पंचायत समितीच्या दहा गणाचे आरक्षण सोडत जाहीर…
नायगाव : शेषेराव कंधारे
नायगाव पंचायत समिती कार्यालयाच्या कै.बळवंतराव चव्हाण सभागृहामध्ये गुरूवारी सायंकाळी ४:०० वाजता दरम्यान नायगाव पंचायत समितीच्या दहा गणाची आरक्षण सोडत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यामध्ये नरसी, मुगाव, मांजरम, टेंभुर्णी, बरबडा, कुष्णूर, कुंटूर ,देगाव,आणि नव्यानेच तयार झालेल्या राहेर आणि घुगराळा गणाचा समावेश आहे.
गण निहाय आरक्षण पुढील प्रमाणे नरसी हा गण सर्वसाधारण ,मुगाव हा गण सर्वसाधारण महिला ,मांजरम हा गण अनुअनुसूचित जाती जमातीसाठी राखीव,टेंभुर्णी हा गण सर्वसाधारण महिला , बरबडा अनुसूचित जाती महिला ,कुष्णुर सर्वसाधारण , कुंटुर हा गण अनुसूचित जमातीसाठी , देगाव हा गण ओबिसी महिला , राहेर हा गण सर्वसाधारण महिला , घुगराळा हा गण ना.म.प्र राखीव करण्यात आला आहे.
आरक्षण सोडतीचे महत्त्वपूर्ण कार्य उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रक अधिकारी सचिन गिरी, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार गजानन शिंदे, यांनी पार पाडले यावेळी नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, नायब तहसीलदार डि.डी.लोंढे,आर.जी.चव्हान,एस.एल.हदेश्वर,राजेश्वर अलमवाड, लक्ष्मण अनमवाड, ग्रंथी व शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भिलंवडे , परमेश्वर पाटील धानोरकर , युवराज पाटील, काहाळ्याचे उपसरपंच नागेश पाटील , आनंदराव पा. बावणे , मनोज पा.शिंदे , सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण कदम , जगनाथ पा.बावणे, अवकाश धुप्पेकर , गगाधर कोत्तेवार यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमात नायगाव गणाच्या आरक्षण सोडतीवेळी चिठ्या टाकण्यात आल्या, यामध्ये लहान मुलांच्या हाताने आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली.
जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत नांदेड येथे काढण्यात आली, यात नायगाव तालुक्यातील पाच गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे नरसी गट सर्वसाधारण महीलेसाठी तर बरबडा ओबीसी साठी , माजंरम ओबीसी साठी , देगाव अनुसूचित जाती जमाती साठी , तर बरबडा हा ओबीसी साठी राखीव झाल्याने तालुक्यातील या सोडतीत अनेक दिग्गजांचे गट इतर प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून त्यामुळे अनेकांची गोची झाली आहे. तर अनेक ठिकाणी मोठी तयारी केलेल्या गटात अनेकांचे स्वप्नभंग झाले असुन पाच गटापैकी नरसी हे एकमेव गट ओपन महीलेसाठी सुटल्यानेे अनेकांचे लक्ष नरसी गटाकडे लागले असून येथे उमेदवाराची मोठी गर्दी होणार असल्याचे अंदाज दिसून येत आहे.
आज जाहीर झालेल्या गट व गणाच्या आरक्षण सोडतीत बरेच गट व गण हे इतर प्रवर्गा साठी आरक्षित झाल्यामुळे तालुक्यातील दिग्गज नेते मंडळींचा हिरमोड झाला आहे. आजच्या सोडतीची परिस्थिती पाहता,नायगांव पंचायत समिती व जिल्हा परिषद गटाची निवडणूक अटीतटीची होईल की नाही हे पाहणे औ्सुक्याचे ठरेल.