नायगाव जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणांचा मृत्यूू.

257

 

नायगाव/शेषेराव कंधारे

नायगाव – नांदेड राज्य महामार्गावरील असलेल्या जयराज मंगल कार्यालयांच्या काही अंतरावर भरधाव वेगाने येणा-या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने हरणांचा मृत्यू झाल्याची घटना दि २७जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.सदरील घटनेची माहिती वनरक्षक एम.बी.पवार यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी जावून हरणांचा मृतदेह ताब्यात घेऊन नायगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला.

- Advertisement -

नायगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत धार पावसामुळे नागरीकांचे व वन्य प्राण्यांचे जनजीवन विस्कळित झाले असून नायगाव तालुक्यातील अनेक गावांतील खडकाळ भागात असलेल्या शेतात चा-याच्या शोधत हरणांचे कळप फिरत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहेत.

गगनबीड,माजरम,कांडाळा,भोपाळ्या सह आदीं परीसरात डोंगरात व नदी काठालगत दाट झाडी असल्याने या परिसरात हरणांचे वास्तव्य दिसून येत आहे. मात्र सतत धार पावसामुळे खडकाळ भागात जाण्यासाठी नांदेड नायगाव महामार्ग ओलांडून जावे लागते. महामार्ग ओलांडतांना काही हरणांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. दि.२७ जुलै रोजी सायंकाळी नायगाव जवळ असलेल्या जयराज मंगल कार्यालयांच्या जवळ महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने येणा-या अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणांचा मृत्यू झाला. वाहनाची जोरदार धडक बसल्याने हरणाच्या पोटातील आतडे बाहेर पडल्यामुळे जागेवर मृत्यू झाला.

वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे,वनपरिमंडळ अधिकारी गुरुपवार यांच्या परवानगीने वनरक्षक एम.बी.पवार , वनपाल भालेराव,डाके यांनी घटनास्थळी जावून हरणांचा मृतदेह ताब्यात घेऊन नायगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करून हरणाचा मृतदेह वन विभागाचे कर्मचारी भालेराव व डाके यांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.