रामतीर्थ पोलीसांची वेगवेगळ्या दोन ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई..

533

नायगांव प्रतिनिधी- शेषेराव कंधारे

रामतीर्थ पोलीस ठाण्यात नुकतेच सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झालेले संकेत दिघे यांनी अवैधरीत्या चालना-यां व्यवसायिका विरूद्ध बेधडक मोहिम सुरू केली असून खपराळा येथील किराणा दुकाना जवळ विनापरवाना देशी दारूचे २० बॉटल अवैधरीत्या विक्री करत असताना एकजन मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आले तर गागलेगाव फाटा येथील लक्की हाॅटेलवर धाड टाकली असता विनापरवाना देशी दारुच्या २३ बॉटल अवैधरीत्या विक्री करत असताना एकजन मिळुन आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून दोन ठिकाणांहून पस्तीशे रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

रामतीर्थ पोलिस ठाण्या अंतर्गत मागील एक वर्षापासून गुटखा, मटका , देशी दारू विक्री, लुटमार अशा अवैध धंद्यानी थैमान घातले होते यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच मटका, जुगार चालु असतानाही पोलीस याकडे ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करत होते. अनेक चोरीचा तपास व खुनाचाही तपास लावण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आले नाही.

- Advertisement -

मागील एका वर्षापासून हा प्रकार राजरोसपणे नरसी शहरा सह ग्रामीण भागातही चालू असताना स्थानिक पोलीस प्रशासन काहीच करत नसल्याने त्यांच्या एकुणच कार्य तत्परते बद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात होते.परंतु रामतीर्थ पोलीस ठाण्यात नव्याने रूजू झालेले सपोनि संकेत दिघे यांनी अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई ची धडक मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी नरसी येथील गतिरोधक जवळ रशनाचा ट्रक पकडुन रामतीर्थ पोलिस ठाण्यात लावुन हे गहू राशनचा आहे की नाही या तपासणीसाठी नायगाव तहसील कार्यालयाला कळविण्यात आले आहे.

दि.२३ जुलै रोजी रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खपराळा ता.बिलोली येथील किराणा दुकाना जवळ अचानक धाड टाकली असता मारोती देवराव गोगटे यांनी विनापरवाना देशी दारूचे २० बॉटल अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असताना मिळुन आले तर गागलेगाव फाटा येथील लक्की हाॅटेलवर अचानक धाड टाकली असता येथील मारोती रामजी अचेगावे हे विनापरवाना देशी दारूचे २० बॅटल अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असताना मिळुन आल्याने दोन्ही ठिकाणचे मुदेमालासह दारू जप्त करण्यात आली असुन गोगटे व अचेगावे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून या पथकात सपोनि संकेत दिघे,आडे,रिदकवाल, शिंदे सह आदीं कर्मचारी होते. पुढील तपास सपोनी संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ पठाण हे करत आहेत.

लोहगाव बिट अंतर्गत अवैध देशी दारू व मटका जुगार जोमात सुरू होते परंतु या बिटचे जमदार आर्थिक फायद्यासाठी डोळेझाक करीत होते .नुतन साहयक पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांनी गुपित माहीती काढुन दोन ठिकाणी धाड टाकल्याने लोहगाव बिटच्या जमदारचे पितळ उघडे पडले हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.