नायगाव – उमरी रस्त्याचे काम रखडल्याने चिखलाचे साम्राज्य.

विद्यार्थ्यांना ने आन करणारी बस अनेक दिवसांपासून बंद ... परिणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित....

869

 

 

नायगाव – शेषेराव कंधारे

नायगाव ते कुंटुर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून बंद असल्याने परिसरात पडत असलेल्या रीमझिम पावसामुळे गुडघ्या इतके चिखल साचल्याने रस्त्याची वाट लागली आहे त्यामुळे नरसी ते उमरी बस अनेक दिवसांपासून बंद झाली आहे त्यामुळे अनेक गावांतील विद्यार्थी शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागत आहे तात्काळ संबंधित गुतेदारांकडुन अर्धवट असलेल्या पुलाचे व रस्त्याचे काम करुन घेवून बस चालु करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातुन पुढे येत आहे.

- Advertisement -

          पावसाळ्याच्या तोंडावर नायगाव ते कुंटुर रस्त्याच्या डांबरीकरणाचे व नळकांडी पुलांचे काम एका नामांकित गुत्तेदारा मार्फत सुरू करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदाराने नळकांडी पुलांचे काम करण्यासाठी जागोजागी रस्तापूर्ण उखडून टाकल्यामुळे रस्त्यावर गुडघ्या इतके चिखल झाले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना ने आन करणारी नरसी ते उमरी बस अनेक दिवसांपासून बंद झाली आहे त्यामुळे शेळगाव छत्री, कोकलेगाव,राजगड नगर ,कुंटुर ,बळेगाव सह परीसरातील विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत आहे तात्काळ संबंधित गुतेदारांकडुन अर्धवट असलेले काम पूर्ण करून विद्यार्थ्यांना ने आन करणारी एसटी बस चालु करण्यात यावे अशी मागणी होत आहे. 

रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने दुचाकी व जडवाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

नायगाव शहर हे सर्वच क्षेत्रात प्रसिद्ध असल्याने परिसरातील कुंटुर, बळेगाव,राजगड नगर,कोकलेगाव ,शेळगाव छत्री आदी गावातील नागरिक कामानिमित्त व विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतू रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने चिखलमय होवून रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.