वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन मा.खा.भास्करराव पा.खतगावकरांचा वाढदिवस साजरा.

510

 

 

नायगांव प्रतिनिधी – शेषेराव कंधारे

माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस बिलोली तालुक्यातील रामतिर्थ सर्कल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व विविध ठिकाणी वृक्षारोपण डॉ मिनल पाटील खतगावकर मित्र मंडळाच्या संकल्पनेतून दि.२३ जूलै रोजी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला आहे.

- Advertisement -

       रामतिर्थीचे मा.उपसरपंच संतोष पा पुयड यांनी दरवर्षी काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री माजी खा.राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व,जनसामान्याचे प्रश्न जाग्यावर बसून मार्गी लावणारे असे श्री.भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करतात कधी वृक्षारोपण तर कधी गरीबांना धान्य वाटप,तर कधी अपंग व्यक्तींना छत्र्या वाटप तर कधी पारधी लोकांना नविन कपडे वाटप तर कधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आशा पद्धतीने समाजातील विविध घटकांची गरज ओळखून दरवर्षी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस साजरा करतात…

 

वाढदिवसाचे औचित्य साधुन दि.२३जुलै रोजी रामतीर्थ सर्कल मधील हिप्परगा माळ,किनाळा,रामतीर्थ,शंकरनगर,बिजुर,चिटमोगरा, बोरगांव थडी,केरुर,कामरसपल्ली सह आदीं गावांत वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने भास्करराव पाटील खतगावकर दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी यावेळी हणमंतराव पा. तोडे, माधवराव कंधारे,विठ्ठल माने, शेषराव रोकडे,बाजिराव रोकडे, मुरलीधर देगलुरे, बळवंत वाडेकर, जयवंत देगलुरे, हणमंत वाघमारे, शिवाजी खिसे, बालाजी शिनगारे, अंकुश मोरे, बळवंत बंडगर, रमेश भेलोडे, पांडुरंग भेलोडे, अनिल जाधव, दिपक जाधव, हणमंत जाधव, आकाश कोकणे, हणमंत पेंटे,सोमेश पाटील, भास्कर तरटे,दिंगाबर हजारे, बालाजी सुगावे,धम्मपाल तरटे, बळवंत पाटील, रमेश मोहिते,पपु पाटील, खुशाल पाटील,माधव जमादार, बालाजी भोसले, रावसाहेब मोहिते, विलास पांचाळ,रामनवार सावकार, संतोष दासरवाड, दिलीप सोडारे मारोती रोकडे,दिगांबर शिनगारे यासह रामतीर्थ, किनाळा, हीप्परगा माळ,बिजुर, कामरसपली, बोरगाव थडी, चिटमोगरा, केरूर,आदमपुर, अटकळी सह आदीं गावातील नागरिक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.