प्लास्टिक विरुध्द नायगाव नगरपंचायतची धडक कार्यवाही सव्वा क्विंटल प्लास्टिक जप्त.

अवैध वापरकर्त्या कडून  १५ हजारांचा दंड वसूल.

654

 

नायगाव: शेषेराव कंधारे

स्वच्छ भारत  मिशन अभियान अंतर्गत नायगाव नगरपंचायतच्या विशेष पथकाने बुधवारी दि.२० जुलै रोजी मुख्य रस्त्यावर असलेल्या अनेक प्रतिष्ठानांवर अचानक धाड टाकून जवळपास दोन दुकानातून सव्वा क्विंटल प्लास्टिक जप्त करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. हि कारवाई नायगाव नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी भोसीकर यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

- Advertisement -

शासनाने प्लास्टिक वापराला सर्वत्र बंदी घातली आहे. असे असतानाही नायगाव शहरात प्लास्टिक वापर सुरू आहे, ही बाब नायगाव नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार भोसीकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने विषेश पथक घेऊन नायगाव नगर पंचायतीच्या हद्दीत असलेल्या जवळपास पस्तीस दुकानांमध्ये अचानक धाड टाकुन झाडाझडती घेतली असता यात न्यु साई किरणा दुकानात जवळपास १२५ किलो प्लास्टिकच्या वस्तू जप्त करून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर ज्ञानेश्वर किरणा स्टोअर्स मध्ये ८ किलो प्लास्टिकच्या वस्तू जप्त करून ५ हजार रुपये दंड वसूल करून दोन्ही दुकान मालकांवर प्लास्टिक दंडात्मक कारवाई करून एकूण १२५ किलो प्लास्टिक जप्त करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या विषेश पथकात नगर पंचायतीचे मुख्य अधिक्षक नंदकुमार भोसीकर, संताराम जाधव, संभाजी भालेराव, कोलमवार,भिमा गोविंदे,मुन्ना मगरुळे,मैला चाॅंदसाब,उमेश कांबळे, बालाजी बोईनवाड,माधव सिरसागर, प्रथमेश भालेराव, प्रविण भालेराव, बालाजी चव्हाण सह आदीं कर्मचारी उपस्थित होते.

नागरीक दुकानदारांनी सिंगल  प्लास्टिकचा वापर करू नये केल्यास यापुढे कारवाई चा धुम धडाका सुरुच राहणार असेही आदेश नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.