संत महंत, गुरुवर्य व राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत डी.बी.पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण.

328

 

नायगाव-  नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क

संत, महंत, गुरुवर्यांच्या सानिध्यात , राजकीय मान्यवर व प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने कै.डी.बी.पाटील होटाळकर यांच्या देखण्या पुतळ्याचे रविवारी नायगांव येथे थाटात अनावरण करण्यात आले.सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेञात उल्लेखनीय कार्याची छाप असंणाऱ्या कै.डी.बी.पाटील यांच्या संस्मरणीय आठवणींना यावेळी मान्यवरांनी उजाळा दिला.

- Advertisement -

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव चिखलीकर होते.समारंभाचे उद्घाटक माजी खा.मंत्री भास्करराव पाटील खतगांवकर यांच्या हस्ते झाले.प्रारंभी महंत यदुबन महाराज कोलंबीकर, सदगूरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुबाबा महाराज औसेकर, ह.भ.प गोरखनाथ महाराज औसेकर यांची होटाळकर कुटूंबाच्या व गोजेगावकर यांच्या वतिने धान्य तुला करून पूजन व पूर्ण आहेर देऊन सन्मानित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै.डी.बी.पाटील होटाळकर यांच्या पुतळ्याचे मोठया थाटात मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले.यावेळी संजीव कुलकर्णी व बाळासाहेब पांडे यांनी संपादित केलेली आठवणीतले डी बी या स्मरणिकेचे व सुनील रामदासी यांनी संपादित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व कै.डी.बी.पाटील होटाळकर बालक उद्यानाचे भूमीपुजनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

यावेळी खा.प्रतापराव चिखलीकर, माजी खा.भास्करराव खतगांवकर, स्वच्छतादूत माधवराव पा. शेळगांवकर, आ.रणजितसिंह मोहीते पाटील, माजी आ.वसंतराव चव्हाण, डाँ.माधवराव किन्हाळकर, आ.विक्रम काळे आदींनी मनोगत व्यक्त करतांना कै.डी.बी.पाटील यांच्या कार्यकर्तत्वाचा गौरव केला.माजी शिक्षण व अर्थ सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी प्रास्ताविक केले.

मिलेनियम इंग्लीश स्कुलच्या मैदानावर झालेल्या या देखण्या समारंभाला श्रावण पा. भिलवंडे, सौ.जयश्री पावडे, प्रविण चिखलीकर, हरिहरराव भोसीकर, रवींद्र भिलवंडे, सय्यद रहीम, अशोक पा.मुगांवकर, प्रा.संजय पाटील, संभाजी भिलवंडे, बालाजी बच्चेवार, सभापती संजय बेळगे, राजेश कुंटूरकर, शंकर कल्याण, बाबुराव लंगडापुरे, विजय चव्हाण,श्रीनिवास पाटील चव्हाण, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थितीत होते.

संयोजक शिवराज पाटील होटाळकर व दत्ताञय पाटील होटाळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.सोहळ्याचे दिमाखदार सुञसंचलन व्यंकटेश चौधरी, पञकार बाळासाहेब पांडे व दिलीप पांढरे यांनी केलै.नायगांव पंचक्रोशीतील असंख्य नागरिक, महिला भगिनी व युवक यांची यावेळी मोठया संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.