नांदेड शहरात नियोजित ठिकाणी तात्काळ बुद्धमूर्ती बसवन्यात यावी – प्रशांत गोडबोले
नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
गेल्या काही वर्षापासून नांदेड महानगरपालिका प्रशासन व लोकनियुक्त प्रतिनिधी हे दलित वस्ती निधी चा योग्य वापर करत नसल्यामुळे नांदेड शहरात दोन वर्षापूर्वी रिपब्लिकन महा मोर्चाचे आयोजन केले होते त्या मोर्चाच्या अनुषंगाने दलित वस्ती निधी दलित वस्तीत वापरण्यात यावा व त्यातच प्रमुख मागणी म्हणून नांदेड येथील भीम घाट गोदावरी नदी पात्रात भव्य अशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 100 फुटाची मूर्ती बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्यातील सर्व बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत या संदर्भाने आज महापालिका कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे अमरण उपोषनास रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
नांदेड शहरातील नियोजित ठिकाणी तात्काळ बुद्धमूर्ती बसवण्यात यावी आणि महापालिका प्रशासनाचा मनमानी कारभार जिल्ह्यात कदापि खपवून घेणार नाही या संदर्भाने महापालिका आयुक्त यांना तीव्र आंदोलनाचा इशारा चे आज निवेदन देण्यात आले यावेळी प्रशांत गोडबोले रिपब्लिकन युवा सेना जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष अमोल पट्टेवाड, शहराउपाध्यक्ष नंदू पोहरे,प्रकाश वाघमारे, किरण निखाते आदी.कार्यकर्ते होते.