फिल्मी स्टाईल पाठलाग करुन शंकरनगर येथे तरुणावर चाकूहल्ला
जखमींवर नायगाव रुग्णालयात उपचार सुरू
नायगाव/शेषेराव कंधारे
डोनगाव खुर्द तालुका बिलोली येथील तरुण राजेश शिवराम वाघमारे यांनी शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास शंकरनगर ता. बिलोली येथील बस स्थानकाजवळ उभा असलेल्या डोणगाव खुर्द येथील माधव नारायण वाघमारे ह्या तरुणांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या पोटात चाकूने भोसकून जखमी केले असून जखमिवर रामतीर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून याप्रकरणी रामतीर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
डोणगाव खुर्द ता. बिलोली येथील माधव नारायण वाघमारे वय वर्ष 30 हे दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शंकरनगर येथील भर चौकात उभा असताना डोणगाव येथील राजेश शिवराम वाघमारे वय वर्ष 35 हे शुल्लक कारणावरून सिनेस्टाईल पाठलाग करत माधव वाघमारे यांच्या पोटात चाकूने भोसकून जखमी केले.
शंकरनगर येथील भर चौकात भर दिवसा हा सिने स्टाइल प्रकार पाहून येथील अनेक नागरिक भयभीत झाले होते याच वेळी येथील शालेय विद्यार्थिनी व चिमुकली मुलं बस स्थानकाच्या जवळ उभी असताना हा सिनेस्टाइल प्रकार पाहून अनेकजण सैरावैरा भयभीत होऊन पळत होते याच दरम्यान माधव वाघमारे हा आपला जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन पर्यंत धावत असताना राजेश वाघमारे हा त्यांच्या पाठीमागे पोलीस स्टेशन पर्यंत हातात चाकू घेऊन मागे धावत होता हा सर्व प्रकार पाहून येथील नागरिक मात्र भयभीत झाले होते.
हा सर्व प्रकार भर दिवसा पोलीस स्टेशन जवळ घडल्याने हा मनोरुग्ण आहे की काय म्हणून अनेकजण भयभीत झाले होते सुदैवाने जीवित हानी झाली नसून जखमी माधव वाघमारे यांना तात्काळ रामतीर्थ पोलिसांनी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले या घटनेची सविस्तर माहिती रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि विजय जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून याप्रकरणी आरोपी जवळून चाकू ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केले.
ही घटना घडल्याचे समजताच धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतले.
डोनगाव खुर्द येथील माधव वाघमारे यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून चाकू हल्ला करून जखमी केल्यानंतर राजेश शिवराम वाघमारे हाही पोलीस स्थानकात स्वतः जाऊन हजर झाल्याने तो हा गुन्हा का केला या मागचे कारण मात्र समजू शकले नाही परंतु तो मनोरुग्ण असल्यासारखे पोलीस स्थानकात काहीही बडबडत होता तो मनोरुग्ण आहे की तो कौटुंबिक टेन्शन मधून हा गैरप्रकार केला की त्यांच्यामागे अन्य कोणते कारण आहे हे मात्र समजू शकले नाही.
