शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा कुंटुर येथे सत्कार अरुण अनिल कांबळे ,अनिकेत कमळे, विवेक कदम यांचा यथोचित सत्कार
कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हणमंते
नायगाव तालुक्यातील कुंटुर येथील जिल्हा परिषद शाळेतिल शाळेतील विद्यार्थी अनेक परीक्षा मध्ये भाग सहभाग घेऊन उत्तीर्ण होत आहेत .कुंटूर येथील जिल्हा परिषद शाळा ही नाविन्यपूर्ण शाळा म्हणून ओळखली जाते ,शाळा एक गुणवत्तेचे माहेरघर व गुणवत्ताधारक विद्यार्थी येथून पुढील कार्यास उत्तीर्ण होऊन आपापल्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण काम करत आहेत. आगळेवेगळे व उत्कृष्ट शिक्षण देणारी शाळा तसेच गुरुवर्य येथील शिक्षक यांच्या मेहनतीचे फळ म्हणून विद्यार्थी परीक्षा मध्ये उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव लोकीक करत आहेत.
शिक्षण विभागा अंतर्गत दोन केंद्रप्रमुख या अंतर्गत शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला .
यावेळी तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कु. अरुण अनिल कांबळे तसेच अनिकेत कमळे, विवेक कदम या तीन विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थाना वही सट, पेना पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल आणि कुंटुर सर्कल अंतर्गत सुजलेगाव केंद्र अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा अंतरगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा ,जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर ,जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा ,इंग्लिश स्कूल कुंटूर आधी शाळेचे विद्यार्थी पाचवी व आठवी मध्ये शिष्यवृत्तीधारक झाले आहेत .
अशा विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथे कार्यक्रम घेऊन यथोचित सत्कार बीट च्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला . यात अरुण अनिल कांबळे कुंटूर ,विवेक कदम कुंटूर गंगाधर स्वामी, पवन देवरे, निकिता नाईकवाडे, अनुजा शिंदे ,श्रावणी लव्हाळे ,शिवराज शिंगणे ,ज्ञानेश्वर ढगे, अश्विनी कोत्तापल्ले, जयश्री शेंडगे ,भक्ती कोमलवार ,
तनुजा अलेवार, प्रेरणा ढवळे, रुतुजाबडुरे, योगेश धुमाळे ,शरद हनुमंते ,राज नंदनी शिंदे ,मेघा शेवाळे,, गणेश पवार ,शुभांगी गायकवाड, श्रुती शिंदे, शेख रहीम शेख अली ,नम्रता शंकर ,प्रमोद वाघमारे ,मंदाकिनी जमदाडे ,राजेश ढगे ,या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी अशोक पवळे ,
शिक्षण विस्ताराधिकारी सुरेश पाटील ,केंद्रप्रमुख मंगेश मालोजी हानवटे, माधव रेडवाढ मुख्याध्यापक एस बी राजपूत सर, विनायक पद्मावार सर,मीना चाटोरे, कंतुलवाड मडम, , शिंनगिरे मडम, गायकवाड मडम, वाघमारे मडम,बावने सर, अरविंद जामकर, नेहरु रामचंद्रसर, कचकलवाड सर, , चव्हाण सर, मुंडे सर, जाधव मडम, दुर्गम मडम, लव्हेकर मडम, भैरवाड सेवक,आदीसह गावकरी पालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.