संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिर संपन्न, पत्रकारासाठी व कुटुंबासाठी केले मोफत उपचार.

526

नायगांव प्रतिनिधि  – रामकृृष्ण मोरे

संजीवनी हॉस्पिटल नायगाव येथे रविवारी सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार व अस्थिरोग उपचार शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास नांदेड येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अवधूत मोरे निर्मल हॉस्पिटल नांदेड यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले.
या शिबिरास तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेतला. पत्रकारिता करत असताना कुठल्याही वेळेच व वयाच बंधन नसते अश्या परिस्थिती त्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबावर व स्वतःवर लक्ष देणे दुरापास्त होते हा मुद्दा लक्षात घेऊन संजिवनी हॉस्पिटल, नायगावयांच्या पुढाकारातून पत्रकार बांधवांची व त्यांच्या कुटुंबाची मोफत तपासणी केली गेली. या शिबिरात तालुक्यातील बहुतांश पत्रकार यांनी तपासणी करून घेतली.
या शिबिरात हाडांची ठिसूळता तपासणी,शरीरातील युरिक एसिड तपासणी मोफत , हाडाच्या कर्करोगा संबंधीत माहिती व उपचार, गुडघे, माण, कंबर, पाठदुखी, सूज येणे, मणक्याचे आजार,जुने फ्रॅक्चर, हाडाचा कर्करोग आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला.

जिल्हा पातळीवरील डॉ. अवधूत मोरे यांनी कमी खर्चात रुग्णाची सेवा करून शिबिर संपन्न केल्यामुळे तालुक्यातील नागरिकामधून व पत्रकारा मधून समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

एक अभिनव उपक्रम राबवल्या बद्दल मराठी पत्रकार बांधव यांनी डाँ. अवधूत मोरे व संजीवन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा श्री. श्रीराम पाटिल शिंदे गडगेकर यांचे आभार मानले. नायगाव तालुक्यातील सर्व नागरिकांच्या व पत्रकार बांधवाच्या आरोग्याच्या काळजी साठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच नागरिकांच्या सेवेसाठी दर रविवारी संजीवन हॉस्पिटल येथे भेट देणार असल्याचे विचार डॉ. अवधूत मोरे यांनी यावेळी मत मांडले .

Leave A Reply

Your email address will not be published.