शेवटच्या दिवशी प्रचाराला रॉ.काँ.चे जिल्हाध्यक्ष उतरल्याने चर्चेला उधाण.

नायगाव नगर पंचायत विशेष

547

 

नायगाव प्रतिनिधी – रामकृष्ण मोरे

 

नायगांव नगरपंचायत ची रणधुमाळी चालू असून दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी रॉ.काँ.चे जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस मैदानात उतरल्याने नायगाव मध्ये चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की नायगाव नगरपंचायत च्या 17 जागेपैकी 3जागा काँग्रेस ने बिनविरोध जिंकल्या असून 11 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले असून उर्वरित 3 जागेसाठी 18 जानेवारी रोजी मतदान असून 19 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे.

नगरपंचायत रणधुमाळीच्या पहिल्या टप्यापासून काँग्रेस आघाडीवर असून भाजपनेही टक्कर देत सर्व जागी उमेदवार उभे केले. शिवसेनेने मात्र फक्त पहिल्याच टप्यात 3 जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. पहिल्या टप्प्यात एकाही जागेवर रॉ.काँ.ने आपला उमेदवार दिला नसल्याने टीकेची झोड उठल्यावर जिल्हाध्यक्षानी गोरठेकर यांची विहीनबाई यांचा बी फॉर्म लपउन तालुकाध्यक्षानी दिला नसून पक्ष विरोधी कार्यवाही केल्यामुळे हकालपट्टी केल्याचे मीडिया समोर सांगितले. त्यानंतर भिलवंडे यांनी आरोप फेटाळत सूडबुद्धीने कार्यवाही केल्याचे पत्रकार परीषद घेऊन सांगितले व थेट मुंबई येथील पक्ष कार्यालय गाठून आपली बाजू मांडली.

 

         जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यात वादाची ठिणगी पडल्यामुळे रॉ.काँ चा वार्ड क्रमांक 11 मधील तिसरा उमेदवाराने थेट काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे रॉ.काँ चे जिल्हाध्यक्ष तोंडघशी पडल्याचे जनतेतून चर्चिल्या जात आहे.

रॉ.काँ.चे जिल्हाध्यक्ष हे सध्या ना.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असून त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षाशी तडजोड केल्याचे जनतेत उघड बोलल्या जात असून ती बाब समोर येऊ नये म्हणून तालुकाध्यक्षाचा बळी घेतल्याचे जनतेत बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्षानी पक्षाचा बी फॉर्म गोरठेकर यांना दिला असल्याचे ऑडिओ क्लिप व्हायरल करून तालुकाध्यक्षानी जोर का झटका देत सत्यस्थिती दर्शविल्यामुळे रॉ.काँचे जिल्हाध्यक्ष एकाकी पडल्याचे चित्र आहे. हे सर्व तडजोडीचे राजकारण घडत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.

     हे सर्व घडत असताना 17 जागेपैकी 15 जागा हातून गेल्यावर फक्त दोन जागेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी फोटोग्राफी केल्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.