धडधडीत सत्य समोर असताना प्रशासनाकडून कारवाई करण्यास विलंब का ? – शेख आरीफ नरसीकर

शासनाच्या मालमत्तेची चोरी होतांना कळल्यानंतरही प्रशासन गप्प.

159

 

नायगांव प्रतिनिधी  ( रामप्रसाद चन्नावार )

 

मौजे राजगडनगर येथील अवैध मरूम उत्खनन करण्यात आलेल्या शासनाच्या मालमत्तेची चोरी होतांना स्थानिक प्रशासनाला कळल्यानंतरही अद्याप तरी प्रशासनाकडून कोणतीच कारवाई नाही धडधडीत सत्य समोर असताना कारवाई साठी विलंब होत असून शासनाच्या मालमत्तेची चोरी होतांना कळल्यानंतरही प्रशासन गप्प का ? असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते शेख आरीफ नरसीकर यांनी उपस्थित केला आहे

- Advertisement -

तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याच्या भरण्यासाठी कंत्राटदार अंकुश पवार यांनी राजगड नगर येथून गट क्रमांक १९३ मधून शंभर ब्रास मरून उत्खननाचा परवाना मागीतला होता परंतु सदरील ठेकेदारांनी शंभर ब्रास मरून उत्खननाच्या परवान्याखाली हजारो ब्रास मुरूम उत्खनन करून शासनाच्या लांखो रूपयांचा महसूल बुडविला आहे एवढेच नाही तर सदर गट क्रमांक सोडून गायरान जमीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन करून अवाढव्य खड्डा करण्यात आला यामुळे सदर प्रकरणाची माहिती संबंधित तलाठी,मडळाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आली व त्या दिवशी चे चित्रीकरण पाठवण्यात आले परंतु तहसीलदारांनी मी पाहतो म्हणून वेळ मारून नेली त्यानंतर एसडीएम महेश जमदाडे यांच्याशी संपर्क साधले असता लेखी तक्रार देण्याचे सांगितले त्यामुळे मा.जिल्हाधिकारी,एसडीएम व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले परंतु अद्यापही सदर प्रकरणांवर कोणतीही कारवाई झाली नाही प्रशासनाकडून कारवाई करण्यास विलंब होत असल्याने याचा फायदा घेत संबंधित ठेकेदारांने उत्खनन केलेला अवाढव्य खड्डा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे

   कोकलेगाव येथील पुलाच्या भरणासाठी वापरण्यात आलेला भरणा बघितला तर दहा हजार पेक्षाही जास्त मुरूमाचा भरणा दिसत आहे नुकतेच एसडीएम महेश जमदाडे यांनी राजगड नगर येथील अवैध उत्खनन करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून नायगाव चे तहसीलदार काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे

   राजगडनगर येथील अवैध उत्खननाबाबद मंडळाधिकारी शेख यांच्याशी संपर्क साधले असता एसडीएम यांनी चौकशी चे पत्र काढलेले मला काही माहित नाही असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.