मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या स्पर्धेत असल्यानेच भोसीकराकडून सुड भावनेतून कारवाई : भास्कर भिलवंडे यांचा गंभीर आरोप

981

 

 

नायगाव : नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क

नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आणि मी जिल्हाध्यक्षाच्या स्पर्धेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर हे सुडाचे राजकारण करत आहेत. याच सुडाच्या राजकारणातून त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भिलवंडे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.
दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र समाज माध्यमातून व्हायरल झाले होते. बुधवारी भिलवंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका मांडतांना त्यांनी भोसीकरावर जोरदार पलटवार केला. मी सन २००९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहे. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वात मोठा पक्ष म्हणून नावलौकीक ठेवण्यात यश आलेले आहे. ऐन नायगाव नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर माझ्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला होता. मी माझ्या दुःखात असताना इकडे भोसीकर माझ्या विरोधात कटकारस्थान करत होते. मी आजपर्यंत पक्षाचे निष्ठेने काम केलो आहे, अनेक निवडणुकांना सामोरे गेलो पण भोसीकरासारखा पळपुटेपणा केला नसल्याचे सांगितले.
नायगाव नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी सामुहिक असतांना कारवाई मात्र माझ्यावरच करण्यात आली यावरुन हेच लक्षात येते कि, भोसीकर हे चेल्याचपाट्यांचे ऐकून सुडभावनेतून कारवाई केली आहे. पक्षातून काढताना कुठलाही कारणे दाखवा नोटीस बजावली नाही कि पक्षातून काढलेले पत्र आजपर्यंत दिले नाही. पक्षातून काढताना जिल्हाध्यक्षांची बदनामी करतात असा आरोप करण्यात आला आहे याला उत्तर देतात भिलवंडे म्हणाले कि, मी बदनाम केलो व अपमान केल्याचा एक तरी उदाहरण द्यावे उलट भोसीकरांनीच माझी बदनामी व्हावी यासाठी पक्षातून निलंबित केले आहे. माझ्यासारख्या १३ वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या एखाद्या पदाधिकाऱ्याला पक्षातून काढताना हकालपट्टी हा शब्द कितपत शोभतो. त्यामुळे हि सर्व कारवाई हेतुपुरस्सर आहे असेच दिसून येत आहे.
भिलवंडे यांनी या पत्रातील भाषेवर आक्षेप घेतला असून पक्षातून काढताना पत्रात अतिशय शिवराळ भाषा वापरण्यात आली ती भोसीकरांना शोभणारी नाही. आम्ही आदरणीय पवार साहेबांचे नेतृत्वात काम करणारी मंडळी आहोत. आमचे सर्व कुटुंब मनमिळावू स्वभावाचे आहे. आम्हाला असे शब्द कुठेतरी बोचतात जिल्हा अध्यक्ष महोदय आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत त्यांनी असे विचार करून हे शब्द वापरायला पाहिजे होते. येत्या काळात मी पक्षश्रेष्ठी पुढे पण माझी बाजू मांडणार आहे. मांडल्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य राहणार आहे. यावेळी भाऊसाहेब चव्हाण,गंगाधर नव्हारे,दादाराव रोडे, रघुनाथ सोनकांबळे,अँड.सचिन जाधव,बालाजी पाटील सांगीवकर,गजानन पाटील होटाळकर,संजय चव्हाण,श्याम चोंडे,माधव कोरे,जळबा सुर्यवंशी,सुधाकर कोकणे पाडूरंग बागडे, रंजित गोरे, व ईतर जन उपस्थित होते.

- Advertisement -

   मागील १३ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतांना कुणालाही वरच्या पदावर जावे असच वाटते आणि मी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत.होतो हीच बाब भोसीकरांना खटकली आणि तेव्हापासून त्यांनी सुडाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.