जिल्हा परिषदनांदेड

नरंगलच्या चौदाव्या वित्त आयोग कामांच्या चौकशीचे आदेश काढुन चार महिने उलटुनही चौकशी होईना?


 

 

नायगाव / शेषेराव कंधारे


नायगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे आंधळं दळते कुत्र पिठ खातय अशी गत सुरू असुन नरगल येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मिळालेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून थातुर मातुर कामे करुन फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या सर्वंच कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी चक्क ग्रामपंचायतीचे सरपंच शांताबाई पांचाळ यांनी नायगाव च्या गटविकासाधिका-यां कडे मागणी करून चार महीने उलटले तरीही संबंधित गावची चौकशी करण्यात नायगाव पंचायत समिती च्या विस्तार अधिका-यांना वेळ मिळत नसल्याने अश्रर्य व्यक्त करण्यात येत असुन सदर चौकशी करण्यासाठी अजून किती महीने वेळ लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     शासन गावे सक्षम व्हावेत गावातील सरपंचाला गावात विकास कामे करण्यासाठी चौदा वित्त आयोगाचा माध्यमातून लोकसंख्येच्या आधारावर दर वर्षी निधी दिला जातो पण ब-याच गावात सरपंच ग्रामसेवक हे आपली मनमानी करत सतेच्या दुरूपयोग करून निधी लाटण्याचा सपाटा लावले आहेत .

 

       नायगाव तालुक्यातील नरगंल येथे मागील काळात तत्कालीन ग्रामसेविकेने या निधीचा दुरूपयोग करत भष्टाचार केल्याची तक्रार देण्यात आली आहे नायगाव तालुक्यातील नरंगल येथे तत्कालीन ग्रामसेवक विद्या मोरे यांनी सन 2017-2018 ते 2021 पर्यंतच्या कार्यकाळात 14 वित्त आयोगा अंतर्गत जो निधी ग्रा.पं. स्तरावर आलेला आहे तो कामे न करता एका विशिष्ट एजन्सीच्या संगनमताने चेक देऊन बोगस कामें करून निधी हाडप केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ग्रा.पं.निवडणुक लागण्याच्या अगोदर प्रशासक विस्तार अधिकारी नेमलेला असताना कुठलाच अधिकार ग्रामसेवकाला पैसे उचलण्याचा नसताना , स्वतच्या बुध्दीचा योग्य वापर करून मागिल तारीख टाकून चेक विशिष्ट एजेंसी ला देऊन परस्पर पैसे उचलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. त्यामुळे पॅनल प्रमुख तथा माजी सरपंच श्रीहरी देशमुख नरगंलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामाची चौकशी करून संबंधित आधिका-यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच शांताबाई पांचाळ, उपसरपंच प्रकाश वाघमारे, सदस्य विठ्ठल वटंवे, सुरेखा वडजे, ललिता देशमुख,लक्ष्मीबाई चांदु बाघमारे, बालाजी तेलंग यानी नायगाव च्या गटविकासाधिका-यां निवेदनाव्दारे करण्यात आले होते .
त्यानंतर श्रीहरी देशमुख यांच्या उपस्थिती आ.राजेश पवार यांना ही तक्रार दिल्याने आ.पवार यांनी तक्रारीची दखल घेत जि.प.च्या सीईओना चौकशी करण्याचे पत्र दिले .त्यानंतर जिल्हा दौ-यांवर आलेल्या पीआरसी प्रमुखाची व समिती मधील सदस्यानां भेटून श्रीहरी देशमुख यांनी तक्रार दिले तरी अद्याप या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नायगाव पंचायत समिती च्या अधिका-यांना वेळ मिळाला नाही त्यामुळे नायगाव पंचायत समिती मध्ये कायदा पायदळी तुडवल्या जात असल्याचे दिसुन येत आहे तरी वरिष्ठ अधिका-यांनी याकडे त्वरित लक्ष देउन चौकशी करावी अशी मागणी होत आहे .

    याबाबत गटविकासाधिकारी प्रभाकर फाजेवाड यांच्याशी संपर्क केला आसता मी चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी कांबळे यांना आदेश दिले पण आतापर्यंत चौकशी झाली नाही परंतु मी येत्या चार पाच दिवसात स्वता नरगंल येथे जाऊन चौकशी करतो व चौकशीत दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »