धनंज येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत वर्धिनी आमसभा

वर्धिनी यांना कोरोनायोद्धा प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित

393

 

 

 

नायगाव / प्रतिनिधी


तालुक्यातील धनंज येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती नायगाव च्या वतीने वर्धिनी आमसभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.दिनांक २४ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत अरुना सराटे,आशा गच्चे, ज्योती सरपते ,पृथ्वी पडियार या वर्धिनीनी विश्रांती धडेकर याना सीआरपी. पदी निवड करून सर्व गावात फिरून १० स्वयं सहाय्यता समूह तयार करून एक आदर्श निर्माण केला असल्याने त्याचा सत्कार करून वर्धिनी आमसभा संपन्न झाली.

- Advertisement -

या वर्धिनी आमसभेला ग्रामविकास अधिकारी नागेश यरसनवार यांनी महिलांना अभियानाबाबत माहिती देऊन जे स्वयंसहाय्यता समूह एक नंबर चालतील त्या समूहास ग्रामपंचायत च्या वतीने ११ हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे यांनी बचत समूह नुसते तयार करून चालणार नाही तर त्यांनी त्यांचे उद्योग व व्यवसाय उभे करावे.परावलंबी न होता स्वावलंबी बनावे.बचत समूह हे पुरुषापेक्षा महिला सक्षमतेने चालवू शकतात त्या बाबत उत्तम उदाहरणे देऊन पटवून सांगितले .अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व आपल्या घरची उदाहरणे देऊन पटवून सांगितले.

   उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत स्वयंसहाय्यता समूह तयार करण्यासाठी ज्योती विलास सरपते , अरुणा साहेबराव सराटे, आशाताई मधुकर गच्चे ,पृथ्वी रवी पडियार या चार वर्धिनीनी गावातील महिलांना दशसुत्री बाबत माहिती देऊन नियमित बैठक,नियमित बचत,अंतर्गत कर्जव्यवहार,कर्जाची परतफेड,लेखे अद्यावत करणे,आरोग्याची काळजी,शिक्षण जागरूकता,पंचायत राज संस्था समन्वय,शासकीय योजनांचा लाभ,उपजीविका तयार करणे या बाबत सखोल माहिती देऊन धनंज येथे तब्बल ९ स्वयंसहाय्यता समूह तयार करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला असल्याने ग्रामपंचायत च्या वतीने प्रशस्तीपत्र तर मराठी पत्रकार संघ कुंटूर च्या वतीने कोरोना योद्धा प्रमाणपत्र शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.
तसेच या कामी गावचे सरपंच उज्वला पांचाळ, ग्रामसेवक नागेश यरसनवार , व्यंकटराव सूर्यवंशी यांचे देखील भरभरून सहकार्य लाभले आहे.वर्धिनी यांनी १५ दिवस धनंज येथे मुक्कामी राहून चांगले काम करून ९ बचत गट तयार केले.
या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी नागेश यरसनवार ,तालुका अभियान व्यवस्थापक अमोल जोंधळे, बाबुराव डोळे, गौतम धडेकर,बालाजी शिळे, वर्धिनी अरुना सराटे,आशाताई गच्चे ,पृथ्वी पडीयार,ज्योती सरपते , ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार व महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.