कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीची बैठक संपन्न

जुनी पेंन्शन योजना आणि 100 % अनुदानासाठी तीव्र आंदोलन उभारणार.

226

 

 

नायगांव / प्रतिनिधी   ( रामप्रसाद चन्नावार )

पेंन्शन हा कर्मचा-यांचा हक्क आहे. जीवनाचा उमेदीचा काळ सेवेत घालवल्या नंतर कर्मचा-यांच्या आयुष्याच्या संध्याकाळची शासनाने घेतलेली जबाबदारी म्हणून पेंन्शनचे सूत्र प्रस्थापित झाले आहे, याचे पालन करून अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना मिळवण्यासाठी आणि वीस पंचवीस वर्षां पासून विनावेतन काम करणा-या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना 100 % अनुदान मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीने घेतला आहे.

- Advertisement -

        मराठवाडा शिक्षक संघाने या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,  कोरोनाचे सर्व नियम पाळून परळी येथील वैजिनाथराव भोसले सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.

रकारच्या शिक्षक आणि शिक्षणा बाबतच्या उपेक्षेच्या धोरणामुळे देश उभारणीत अत्यंत महत्त्वाचे असलेले हे क्षेत्र पार रसातळाला गेले आहे. याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीने तीव्र चिंता व्यक्त केली. राज्यकर्ते आपले आणि कुटुंबियांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी स्वतः ला घसघशीत पेंन्शन लागू करून घेतात मात्र शिक्षक आंणि कर्मचा-यांना कुचकामी पेंन्शन योजना लागू केली जाते त्यामुळे अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी आणि निकषपात्र विनाअनुदान शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार शंभर टक्के  अनुदान देवून  या शाळांवर कार्यरत शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा एकमुखी  निर्णय  मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीने घेतला आहे.

बैठकीस सरचिटणीस व्ही. जी. पवार यांचेसह नांदेड जिल्यातून जिल्हाध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, उपाध्यक्ष व्ही.आर.चिलवरवार ,संघटक उत्तम लाठकर यांच्यासह मराठवाड्यातील पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.