कै.माधुकरराव पाटील खतगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त उद्या शंकरनगर येथे डॉ.माधवराव किन्हाळकरांचे व्याख्यान

213

 

नरसीफाटा/शेषेराव कंधारे

‘ऋषीतुल्य, ज्ञानमहर्षी’, शिक्षण महर्षी, संस्कृतपंडीत, थोर साहित्यिक, गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे माजी सचिव, शंकरनगर माजी कृषी सभापती कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने स्व‌.मधुकरराव पा.खतगावकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री साईबाबा प्रा.मा.व उच्च मा. विद्यालय व गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर ता. बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता शंकरनगर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ स्मृती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. खा. श्री. भास्करराव पाटील खतगावकर (अध्यक्ष गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर), तर प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.माधवरावजी पाटील किन्हाळकर (अध्यक्ष – दिगंबरराव बिंदू स्मारक समिती शिक्षण संस्था, भोकर) हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.जितेश अंतापुरकर (आमदार देगलूर-बिलोली मतदार संघ),ओमप्रकाश पोकर्णा, वसंतराव पा. चव्हाण (अध्यक्ष, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), हणमंतराव पाटील बेटमोगरेकर (माजी आमदार मुखेड मतदार संघ), अविनाश घाटे,(माजी आमदार मुखेड मतदार संघ) आनंदराव चव्हाण(मा. उमहापौर तथा नगरसेवक, महानगरपालिका, नांदेड),  मा. श्री. सरजीतसिंग गील(माजी उपमहापौर महानगरपालिका, नांदेड), भास्कर पाटील भिलवंडे(उपाध्यक्ष श्री नृसिंह सहकारी सुतगिरणी, खानापुर),डॉ.सौ.मिनल निरंजन पाटील खतगावकर (सचिव, गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट, शंकरनगर) यांची उपस्थिती राहणार आहे.

स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या
प्रथम स्मृतिदिनानिमित्त या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला शासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून परीसरातील नागरिकांनी उपस्थीत राहावे अशी विनंती प्रार्चाय डॉ.बालाजी पिंपळे पाचपिंपळीकर,मुख्याध्यापक धनंजय शेळके, प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, मुख्याध्यापक) धोंडीबा वडजे व सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.