अशोकराव चव्हाण यांच्या सारखा दुसरा नेता मराठवाड्यात कोणीही नाही -भास्करराव पा. खतगावकर

डॉ.मिनलताई पाटील खतगावकर यांचा जि.प.रामतीर्थ सर्कल मध्ये चार कोटींच्या विकास कामांचा वचनपूर्ती सोहळा संपन्न

446

 

 

 

 

नायगाव/ शेषेराव कंधारे

जिल्ह्याच्या विकासासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व गावातील विविध विकासकामे करुन घेण्यासाठी आपण सर्वांनी चव्हाण यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशोकराव चव्हाण यांच्या विचारांच्या उंचीचा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात त्यांच्या सारखा दुरदृष्टीचा नेता दुसरा कोणीही नाही असे मत माजी खा.भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी केले.

- Advertisement -

 रामतिर्थ जिल्हा परिषद सर्कल मधील रामतिर्थ, अटकळी , टाकळी खु,व खतगाव गावातील अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, सभागृह व आरोग्य उपकेंद्र ईमारत बांधकाम अशा विविध कामांचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या डॉ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर यांनी मंजूर करून आनलेल्या सुमारे चार कोटी रुपये निधीच्या विविध विकास कामांचा भुमिपुजन शुभारंभ प्रसंगी रामतिर्थ येथे भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर हे होते उद्घाटक म्हणून आमदार जितेशभाऊ अंतापूरकर हे होते तर व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य डॉ.सौ.मीनल निरंजन पाटील खतगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे,प.स. सभापती सुंदराबाई पाटील,प.स.सदस्या अर्चना शेटिवार, शिवाजी पा.पाचपिपळीकर, आनंदराव बिरादार, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पा.मुंडकर, चंचलवाड, दिलीप पांढरे, जयवंतराव गायकवाड, माधवराव कंधारे, माधवराव वाघमारे, शेपट्टीवार, अभियंता रायभोगे, रोडगे,गरुडकर,प्रदेशी यांच्या सह आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी सभापती संजय बेळगे यांनी आपल्या निधीतून दलित वस्तीसाठी पांच लक्ष रुपये निधी देण्याचे घोषित करुन पाझर तलावासाठी जि मदत लागेल ते देण्याचा पुर्ण पर्यन्त करीन व आमदारांना जेवढा निधी अनंता येत नाही त्याही पेक्षा जास्त नीधी जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून विरोधी पक्षांत असताना डॉ. मिनल खतगावकर यांनी मंजुर करुन अनल्यामुळे बेळगे यांनी तोंडभरून कैतुक केले तर नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांनी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार असे सांगितले.

 

डॉ. मीनलताई पाटील खतगावकर म्हणाल्या की, बिलोली तालुक्यातील रामतिर्थ, अटकळी, टाकळी खु, व खतगाव आदी गावात अद्यापही योग्य त्या मूलभूत सुविधा नाहीत. या सुविधा ग्रामस्थांना पुरवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला असून यापुढेही ग्रामीण जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असून सध्या कोरोनाची तिसरी लाठ मोठ्या फयलत आहे त्यामुळे सर्वांनी कोरोणाची लस टोचून घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी मारोती हेन्टे सरपंच टाकळी खू., उपसरपंच प्रवीण लिंगनवाड,सौ. पुष्पाताई गणपतराव घोडके सरपंच अटकळी, उपसरपंच रणवीर डोंगरे,सौ. मनीषा राजेंद्र तोडे सूरपंच रामतीर्थ, उपसरपंच सौ. जयश्री मुरलीधर देगलरे,सौ. मल्लाबाई मलेश पेटेकर सरपंच खतगाव, उपसरपंच रवी प्रभाकरराव पाटील उपसरपंच खतगाव, गंगाधर अन्नपलवाड, चंद्रकांत देवारे, ग्रामसेवक सुर्यवंशी, हणमंत गजले, हणमंत तोडे, माधवराव कोकणे,पांडुरंग मैहत्रे, संतोष पुय्यड, हणमंत वाडेकर, शिवाजी रोकडे, सदाशिव पाटील, शिवाजी खिसे, रामराम नाईक, बालाजी कुरणापर्ले सह आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.