बरबडा येथील माती उत्खनन प्रकरणी ११ ट्रॅक्टर सह एक जे सी बी जप्त

बिलोली चे सहाय्यक पोलिस अधीक्षक  अर्चित चांडक आणि कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांची धडाकेबाज कार्यवाही

301

 

नायगाव (प्रतिनिधी) – बालाजी हणमंते

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील बरबडा येथील गोदावरी क्षेत्रात नदीच्या पायथ्याला असलेल्या संपादित क्षेत्रातून मातीची खुलेआम पणे चोरी केली जात आहे. ही माती परिसरातील विट भट्टी व्यवसायिकांना विकली जात आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल विभाग तसेच गोदावरी सिंचन विभागाचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. ही माती चोरी रोखून संबंधितांवर कठोर कायेदशीर कारवाई करावी केली आहे. सात भरलेले चार रीकामी आसे ऐकुन ११ ट्रॅक्टर एक जे सी बी ऐकुन अंदाजे ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

- Advertisement -

आय पि एस अधिकारी चांडक यांनी सापळा रचून दि ३०डीसेबर  २:३० वाजता साहेबाच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन शंकरनगर बिलोली, नायगाव, कुंटूर याच्या सहकार्याने छापा टाकून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बरबडा येथील गोदावरी नदीवरील नांदेड हैद्राबाद राज्यामार्गालगाच्या बळेगाव संपादित क्षेत्रातून अहोरात्र वीटभट्टी व्यवसायाकरता मातीची चोरी केली जात आहे. सध्या हिवाळ्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी थेडी फार घटल्याने बरबडा शेतजमिनी थेड्या फर कोरड्या पडल्या आहेत. शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात माती साचली आहे.

यामुळे या परिसरातील स्थानिक माती माफिया मातीची चोरीची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संबधित क्षेत्र हे बळेगाव बंधारा संपादित असल्याने तसेच हे क्षेत्र गोदावरी सिंचन शाखेच्या अंतर्गत व महसूल प्रशासनाने आहे. मात्र येथील कर्मचारी या भागात फिरकत नाहीत, परिणामी याभागात व माती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

बरबडा या भागाला बळेगाव बंधारा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. हे क्षेत्र गोदावरी नदीच्या तीरांपर्यंत आहे. याभागात मोठ्या प्रमाणावर माती आहे. त्यामुळे स्थानिक माती चोरांनी खुलेआम जेसीबी मशीन, ट्रॅक्टर साह्याने माती चोरीचा सपाटा लावला आहे. परिणामी या शेतजमिनीत मोठं मोठे खड्डे पडले आहेत.

पावसाळ्यात नदी पात्रात पाणी प्रवाह किंवा पुर आल्यास नदीचे पात्र बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच या बेकायदा माती उत्खन्ननामुळे शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान होवून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. माती उत्खनन केली जात आहे, त्या ठिकाणी काही जण महसूलच्या नावाखाली पैसे गोळा करून हप्ता वसुली करीत
 असल्यामुळे त्या मातीचे सोने करण्यासाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे व महसूल विभागाचे सहाय्यक लिपिक गादेवार यांच्या आशिर्वादामुळे वीटभटी  धारकांनी मोठया थाटात वीटभट्या थाटल्या आहेत
प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्‍टरच्या साह्याने अवैध मातीची शिपटिंग केली जात असल्यामुळे बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्यासह कुंटूर पोलिसांनी अकरा ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेतले आहे

 बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत एकूण ११ ट्रॅक्टर ताब्यात घेतले तर वीटभटी मालकासह बारा जाणावर कारवाई झाल्याचे समजते यापैकी सात मातीने भरलेले ट्रॅक्टर होते तर चार रिकामे ट्रॅक्टर असल्याचे दिसून आले व एक जेसीबी ताब्यात घेऊन चालकाला ही कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सदरच्या कारवाईत आयपीएस आर्चीत यांच्यासह सपोनि महादेव पुरी,फौजदार दिनेश येवले,    एस एम कुमरे, साई सांगवीकर एस एन बुद्धेवाड, ,पोलीस कॉन्स्टेबल सोनकांबळे आदी कारवाई करून तहसीलदार गजानन शिंदे यांना कारवाईसाठी पत्र पाठवून दिले असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या वरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सपोनि पुरी यांनी सांगितले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.