बळेगावच्या पुलावरून उडी मारून महीलेची आत्महत्या 

255

 

नायगांव / प्रतिनिधी. ( रामप्रसाद चन्नावार )

उमरी तालुक्यातील ४० वर्षीय विधवा महिलेने नायगांव तालुक्यातील कु़ंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळेगाव येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची  घटना दि.२७ रोजी सकाळी घडली. कुंटूर पोलिसांनी मच्छीमारारांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. 

- Advertisement -

     कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळेगाव गोदावरीच्या पात्रात अंदाजे वीस ते पंचवीस फूट पाणी असल्यामुळे उमरी तालुक्यातील तळेगाव व मनूर या गावातील दोन मच्छीमारांना आत्महत्या केलेल्या विधवा महिलेचे प्रेत गोदावरी पात्रातून बाहेर काढण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. सदरील मच्छीमारांचे नाव रमेश रामजी निलेवार रा तळेगाव, तसेच मलंग सरवर बेग,तालुका उमरी जिल्हा नांदेड या मच्छिमारासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, बीट जमादार संतोष कुमरे,पोलीस कॉन्स्टेबल एस एन बुध्देवाड, यांनी सदरील महिलेचे प्रेत कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेऊन नायगांव च्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे  

    उमरी तालुक्यातील मौजे तळेगाव येथील रहिवासी असलेली व बळेगावच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या विधवा मयत महिलांचे नाव अनिता गणपत  वनपवाड वय ४० वर्षे राहणार तळेगाव हल्ली मुक्काम उमरी व माहेर मंडळा असून सदरची विधवा महिला ही सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घराच्या बाहेर पडली असल्याचे तळेगावचे उपसरपंच अयुबखान पठाण यांनी पोलिसांना सांगितले असून सदरची ही आत्महत्या करण्यापूर्वी बळेगावच्या पुलावर खालीवर पाहत होती व फिरत होती असे काही लोकानी सांगत होते .

 गोदावरी पात्रात अगोदरच मच्छीमार मासोळी पकडण्यासाठी येतात त्यांना आपण आत्महत्या करत असल्याचे दिसू नये म्हणून सदरच्या मयत महिलेने पुलावर बसून तोंडाला  बांधण्याची पांढऱ्या रंगाच्या फुलक्याची ओढणी व डोळ्याचा चष्मा व चप्पल पुलावर ठेवली व मच्छीमार तेथून जाताच महिलेने आत्महत्या केली असल्याचे समजते परंतु आत्महत्या करण्या मागचे कारण काय ?  हे मात्र समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.