शेतकर्‍यांनी अधिक नफ्यासाठी आधुनिक पीक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करावा – कृषी अधिक्षक चलवदे

286

 

 

 

 

नायगाव/शेषेराव कंधारे

शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून अधिक नफा कशा पद्धतीने घेता येईल ? यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी केले.

- Advertisement -

      मरवाळीकर कृषी सेवा केंद्र, पवळे पाटील इरिगेशन व भाग्यश्री इरिगेशनचे भव्य शुभारंभ व रब्बी शेतकरी मोळावा दि.२३ डिसेंबर रोजी नरसी येथील बालाजी मंदिरात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ कापूस संशोधन केंद्र नांदेडचे डॉ.खिजर बेग, कृषी विद्यावेता प्रा.अरविंद पांडागळे, लक्ष्मणराव ठक्करवाड, शिवराज होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे, भास्कर पाटील भिलवंडे, रवींद्र पाटील भिलवंडे,सरपंच गजानन भिलवंडे, देविदास पा.बोमनाळे इब्राहिम बेग पटेल, मारोती भिलवंडे, गंगाधर वडगावे, मधुकर ताटे,माधवराव तळेगावकर, बाबुराव हिवराळे, त्र्यंबक डाके,परशुराम पवळे, सचिन पवळे, शिवराज पवळे,माधवराव कोरे,अनिल पवळे आदींची उपस्थिती होती.

   चलवदे म्हणाले की, महाडीबिटी व इतर योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी वर्गाने घेतला पाहिजे. विभागून शेती न करता गट शेती करण्यासाठी आता शेतकऱ्यांनी एकत्रित येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.तर उन्हाळी सोयाबीन लागवड करावी व तेच बियाणे बिज प्रक्रिया करून खरीपाची पेरणी करावी त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज पडणार नाही तसेच मागेल त्या शेतकयांना ठिबक सिंचन व तुषार सिंचन मिळणार असून शासनाच्या अनुदानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन केले.

वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम तूर व हरभरा पिकावर दिसून येत असून मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे. या रोगाचा शिरकाव बुरशीमुळे होतो व त्या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया करून पेरणी करावी.

कापूस उत्पादक वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत परंतु कापसावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव वरचेवर वाढत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे होत आहे त्यामुळे कापूस लागवड करु नये तसेच पारंपरिक वाण न वापरता आधुनिक वाणाची निवड शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन प्रा.अरविंद पांडागळे यांनी केले.
कार्यक्रमांची प्रस्तावना परशुराम पवळे यांनी केले.सुरेख सुत्रसंचलन गंगाधर गंगासागरे यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिन पवळे यांनी मानले.यावेळी नायगाव ,बिलोली व देगलुर तालुक्यातील शेकडो शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.