रात्रीला अवैध रेतीचे वाहतूक करणारे टिपर कुंटुर पोलिसांनी पकडले

248

नायगाव/ शेषेराव कंधारे

              लोहा तालुक्यातील अवैध मार्गाने उत्खनन केलेली वाळू  रात्रीला विक्रीसाठी टिपर भरून नायगाव येथे अनेक दिवसांपासून येत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेत असताना दि.१६ डिसेंबर रोजी पाहटे अवैध रेतीचे टिप्पर क्र.एम.एच‌.२६ इ.बि.१०४८ हा मारताळा – नायगाव रोडवरुन देगाव पाटी जवळ येताच फौजदार दिनेश यवले व इतर साथीदारांनी पकडून कुंटुर पोलीस ठाण्यात लावल्यामुळे अवैध रेती माफिया चे धाबे दणाणले असुन कारवाई करणे चालू असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांनी दिली‌. 
      लोहा तालुक्यातील गोदावरी पात्रात वाळू माफीयांनी धुमाकूळ घातला दररोज हजारो बाॅस वाळू उत्खनन करून रात्रीला अवैध मार्गाने हायवा भरून लोहा ,मुखेड ,नायगाव तालुक्या सह इतरत्र  विक्री  करून शासनाला चुन्ना लावण्याचे काम होत आहे मात्र लोहा महसूल चे अधिकारी थातुर मातुर कार्यवाही करूण मोकळे होताना दिसत आहे. लोहा तालुक्यातील गोदापात्रातुन दिवस रात्र काळी वाळू तराफ्याच्या व बोटीच्या  साह्याने कढून विक्री होत आहे  सदर प्रकार गेल्या अनेक महीण्यापासुन सुरू आहे.परतु या भागात या माफीयावर म्हणावी तशी कार्यवाही झाली नसल्याने या वाळू माफीयांचे मनोधैर्य उंचावले आहे.
           

        दि.१६ डिसेंबर रोजी पाहटे चारच्या दरम्यान मारताळ्याकडून एक हायवा टिप्पर क्र.एम.एच‌.२६ इ.बि.१०४८ वाळू भरून नायगाव कडे जात असल्याची माहिती कुंटुर पोलीस ठाण्यातील फौजदार दिनेश यवले यांनी मिळाली माहीती मिळाल्यावरून यवले,बीट जमादार इजलकुंटे व चालक सदाशिव पाटील यांनी सदर टिप्परचा पाठलाग करुन देगाव पाटी जवळ येताच पकडून वाळू वाहतुकीची पावती आहे का विचारपुस केले पण सदर टिप्पर चालकाकडे कोणतीही पावती मिळुन आली नाही त्यामुळे सदर टिप्पर कुंटुर ठाण्यात लावण्यात आले असुन सदर टिप्पर वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती कुंटुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांनी  दिली‌.

- Advertisement -

   गेल्या वर्षभरापासुन  लोहा तालुक्यातील कोडगाव , यळी अन्य गावातील गोदावरी पात्रातुन दिवस रात्र वाळू माफीयांनी  हजारो ब्रास काळी वाळू वर काढून वाळूची वाहने दररोज रात्री नायगाव शहरासह परिसरात येत असल्याने नायगाव महसूल कडून चोरीचे वाहने पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले पण गेल्या तीन महीन्यात या पथकाला वाळू चोरीचे एकही वाहन सापडले नाही त्यामुळे नायगाव महसुलच्या कारभारावर आश्रर्य व्यक्त करण्यात येत आहे . 

नायगाव महसूल विभागाच्या नाकावर टिचुन कुंटूर पोलीसांनी  कार्यवाही केली हे मात्र विशेष .

Leave A Reply

Your email address will not be published.