मुस्तापुर गावाला मिळालेल्या १४ वा वित्त आयोगाच्या निधीची व शौचालयाच्या कामांची चौकशी करा

275

नायगाव/ शेषेराव कंधारे

      नायगाव तालुक्यातील मुस्तापुर येथील ग्रामपंचायतीच्या आतर्गत शौचालयाच्या कामांची व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून कामे आराखडा नुसार न करता थातुरमातुर करण्यात आले असून त्या सर्वंच कामाची तात्काळ चौकशी करून दोषी आढळुन आल्यास तात्काळ कारवाई करण्याची मागणी रणजीत डोईवाड यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांच्या कडे निवेदनाव्दावारे केली आहे.
सरकारने गावे सक्षम व्हावेत गावातील सरपंचाला गावात विकास कामे करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाचा निधी हा लोकसंख्येच्या आधारावर दर वर्षी निधी दिला जातो परंतु ब-याःच गावात सरपंच ग्रामसेवक हे आपली मनमानी करत सतेचा दुरूपयोग करुत निधी हडप केलेल्या अनेक ठिकाणी निष्पन्न झाले असतांनाच आता नायगाव तालुक्यातील मुस्तापुर येथे मागील काळात तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचांनी या निधीचा दुरूपयोग करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची तक्रार नुकतीच देण्यात आली आहे.

नायगाव तालुक्यातील मुस्तापुर ग्रामपंचायत अंतर्गत एस.बी.एम. व एल.ओ.बी‌.एम.,आर.जी.एस अंतर्गत शौच्छालयाचे कामाचे व १४ व्या वित्त आयोगाच्या योजने अंतर्गत सदरील कामे ग्रामसेवक व सरपंच या दोघानी संगनमत करुन सदरील आराखड्या नुसार कामे न करता कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवुन शासनाची दिशाभुल करुन सदर गाव विकास करणे ऐवजी शासनाचे योजनेचे बिल रेकॉर्डला आराखडाप्रमाणे दाखल करुन सरपंच व ग्रामसेवक या दोघानी रक्कम हाडप करुन हे स्वतःचा स्वार्थ करणा-या ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी करुन दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा नायगाव पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणास बसण्यात येईल असे निवेदन रणजीत ईरबा डोईवाड यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांच्या कडे निवेदनाव्दावारे केली आहे.

 

- Advertisement -

         या बाबत तत्कालीन ग्रामसेवक बच्चेवार यांच्याशी संपर्क साधला असता माझ्या काळात मुस्तापुर येथे शौचालयांची कामे दर्जेदार झाली व १४ वित्त आयोगाचा निधीतुन चांगल्या दर्जाचीच कामे झाली आहेत चौकशी अंती सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया बच्चेवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.