हिप्परगामाळ येथे शनिवारी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व आमदार जितेश अंतापूरकरांचा भव्य नागरी सत्कार सोहळा…

276

नायगाव/शेषेराव कंधारे

हिप्परगा (माळ) ता. बिलोली येथे उद्या दि.१८ डिसेंबर रोजी लॉयन्स क्लब नांदेडतर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन व नवनिर्वाचित विद्यमान आ. जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचा नागरी सत्कार असा त्रिसंगमीय कार्यक्रमांचे आयोजन ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष दासवाड हिप्परगेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून परीसराती गरजु लाभधारकांनी या समाज उपयोगी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व नेत्र तपासणी शिबिराला अध्यक्ष म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे आहेत तर सत्कार मुर्ती नवनिर्वाचित आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर
हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब पाटील खतगावकर,रवि पाटील खतगावकर ,डॉ. मीनलताई निरंजन पा.खतगावकर, सौ सुंदराबाई पाटील, आनंदराव बिराजदार, गिरधर पाटील, मनिषा राजेंद्र तोडे, सदाशिव पा. डाकोरे ,संतोष पुय्यड, राजेश्वर मंदरने, विठ्ठलराव माने, शिवाजी पाटील, अनिल जाधव, आल्याबाई मल्लेश पटेकर, दैवषाला बालाजी कुरनापल्ले, आकाश कोकणे, पुष्पाताई डोंगरे, सय्यद खलील, मारुती हेंटे, मुंडकर मारुती ,उत्कर्ष सोंडारे ,चंदरबाई वाघमारे , अरुणा मारुती धर्मकरे, धनपलवार शिवचरण सह
आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन संतोष दासवाड हिप्परगेकर, विकास सोंडारे,ब्रम्हा कांबळे आदींनी केले आहे.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.