नायगांव ब्लू बेल्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवली हैदराबाद येथे चमक

209

 

 


नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )


जपान कराटे असोसिएशन इंडिया तर्फे आयोजित
हैदराबाद येथे 35 व्या नॅशनल शोतोकान कराटे स्पर्धा 2021.
12 डिसेंबर रोजी विक्टोरिया इनडोअर स्टेडीयम हैदराबाद, येथे आयोजित करण्यात आलेल्या *फाईट & काथाज* इवेंट मध्ये *ब्लू बेल्स शाळेच्या* मुलांनी सहभाग नोंदवला होता. यात गोल्ड, सिल्व्हर, ब्रांज मेडलस मिळविले.यात सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.विद्यार्थ्यांना मेडल्स, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून *बेस्ट कराटे अवार्ड 2021* हा समुहात प्रदान करण्यात आला.
यात *ब्लू बेल्स शाळेचे* विद्यार्थी अलोक गुंडाळे, प्रणवी अल्लमवाड, स्नेहल कौटकर, शशांक शिरोळे, श्रीकृष्णा ब्रह्मकार, आरव सूर्यवंशी, अथर्व कल्याण, विश्वजीत यरप्पलवाड, यश पेन्टे, धरती सूर्यवंशी, क्षितिजा राजेंद्र बैस हे सहभागीहोते. विशेष म्हणजे क्षितिजा बैस या विद्यार्थिने काथाज मध्ये गोल्ड व फाईट मध्ये सिल्वर मेडल मिळवले आहे.
या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र बैस सर यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. के.हरिबाबु सर, मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी टीचर,सल्लागार साई दिप्ती कोप्पेल्लू, पर्यवेक्षक दत्ता कंदुर्के सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे़

- Advertisement -

         सदर स्कूलचे संस्थापक तथा प्राचार्य के हरिबाबु सर यांची शाळा म्हणजे माणसं घडविण्याचा कारखाना होय असे पालकातून समाधानकारक उत्तर मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.