शंकरनगरात चोरट्यांनी वृध्द महिलेचा खून करून अंगावरील दागिने लुटले.

498

बिलोली/शेषेराव कंधारे

शंकरनगर ता.बिलोली येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या निवासस्थानात एकटीच राहणाऱ्या अन्वरबी मौनोदीन शेख वय वर्षे 75 वर्षीय निराधार वयोवर्धन असलेल्या महिलेच्या अंगावरील दाग दागिने काढून घेण्याच्या उद्देशाने तिच्या तोंडाला ओढणीने बांधून तिच्या डोक्यात लाकडी धीपलीने मारुन गंभीर जखमी करून खून करण्यात आल्याची घटना दि.2 डिसेंबर रोजी सकाळी ठीक आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना समजताच ,त्यांनी घटनास्थळी दाखल    होऊन   सदरील मयत महिलेचा पाचनामा करून महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले आहे.

        सविस्तर माहिती अशी की रामतीर्थ ता.बिलोली येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या वसाहतीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत एकटीच घरात राहणाऱ्या अन्वरबी मैनोद्दीन शेख वय वर्षे 75 या महिलेच्या पायातील चांदीचे वाळे, हातातील चांदीचे दंडकडे, गळ्यातील सोन्याची मनी मंगळसूत्रची पोत व सोन्याचे एक ताईत आणि चांदीच्या दोन अंगठ्या अंगावर असलेल्या या वयोवर्ध महिलेस तिच्या अंगावरील हे दागदागिने चोरून घेण्याच्या उद्देशाने दि.1 डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सदरील महिलेच्या घरात घुसून तिच्या तोंडावर रुमालानी बांधून तिला घरात उबडे पाडून तिच्या डोक्यात लाकडी धिपलीने मारून डोके फोडून गंभीर जखमी करून तिचा खून करून तिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन आज्ञत चोरटे फरार झाले असल्याची घटना 2 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
विशेष म्हणजे आज्ञात चोरट्यांनी घरात बसून देशी दारू ढोसुन हा प्रकार केल्याचे दिसून आले या सदर महीलेचा विवाहीत मुलगा चार वर्षा पुर्वी मरण पावल्या पासुन ती येथे एकटीच राहत होती घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना दिली असता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि विजय जाधव हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा करून सदरील महिलेचे प्रेत हे शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून या घटनेचा तपास करण्यासाठी स्वॅन पथक पाचारण करण्यात आले होते.

- Advertisement -

रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नरसी येथे गेल्या काही दिवसापासून चोर्‍यांचे सत्र सुरू असताना पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर मद्यधुंद अवस्थेत अज्ञात चोरट्यांनी महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दाग दागिने लंपास करण्यात यशस्वी झाल्याने राम तीर्थ पोलिसांना यांचा शोध लागेल काॽअसा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून याप्रकरणी रामतीर्थ पोलिसात अद्याप कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नसून या प्रकरणाचा पुढील तपास केल्या जात असल्याचे पोलीस सूत्राकडून कळविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.