शरदचंद्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ.के. हरीबाबू यांची निवड
नायगांव / प्रतिनिधी. ( रामप्रसाद चन्नावार )
नायगाव येथील शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी इंग्रजी विभागाचे प्रमूख प्रा.डॉ.के. हरीबाबू यांची संस्थेचे अध्यक्ष व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण साहेब यांनी त्यांची निवड करून त्यांचा शाल व पुष्पहार घालून पदभार देण्यात आला. मावळते प्राचार्य प्रोफेसर डॉ. बालासाहेब ढेंबरे यांना संस्थेने सहा महिण्यासाठी प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली होती ती 30 नोव्हेंबर, 2021 रोजी समाप्त झाल्यामुळे प्रा.डॉ.के. हरीबाबू यांना प्राचार्य पदाची संधी देण्यात आली. डॉ.के. हरीबाबू हे 1991 पासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाविद्यालयात व नायगाव शहरामध्ये तसेच परिसरात ब्लू बेल्स इंग्रजी माध्यम शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता वाढविण्याचे कार्य केले आहे.
पदभार दिल्यानंतर मा. वसंतराव चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविद्यालयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वच प्राध्यापकांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत त्यामुळेच महाविद्यालयास 2017 मध्ये झालेल्या नॅकच्या मुल्यांकनामध्ये B दर्जा मिळाला आहे. यापुढेही विद्यार्थाची गुणवत्ता आणि नॅकच्या उत्तम मुल्यांकनासाठी आपणा सर्वांनी प्रयत्न करून महाविद्यालयाचे नांव उज्वल करावे असे आवाहनही केले.
प्राचार्यपदाचा पदभार स्विकारल्यानंतर डॉ.के हरीबाबू म्हणाले की, आमच्या महाविद्यालयातील पूर्णवेळ व घडयाळी तासिकावरील सर्वच प्राध्यापक अतिशय गुणवत्ताधारक व क्रियाशील आहेत त्यामुळे पुढील काळात त्यांचा योग्य उपयोग करून महाविद्यालयाची प्रगती करण्याचा प्रयत्न करीन.महाविद्यालयातील सेवा सुविधा, अध्ययन व अध्यापनाचे मुल्यमापन करण्यावर आणि नवनवीन कोर्सेस सुरुवात करुन विद्यार्थाना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन संस्थेला दिले आहे.
यावेळी मावळते प्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.डी. ढेंबरे यांनी मला प्राचार्यपदाची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले आणि महाविद्यालयासाठी जे नवनवीन उपक्रम राबविले त्याबद्दल माहीती दिले. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.वसंतरावजी चव्हाण, संस्थेचे जेष्ठ संचालक केशवराव पा. चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. श्याम पाटील, प्राचार्य डॉ.मारूती माने, प्राचार्य के.जी. सुर्यवंशी,जनता प्राथमिकचे मुख्याधापक गंगाधर चव्हाण, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक प्रशांत बिलवणीकर, मार्केट कमिटी नायगावचे सचिव कदम सर, प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांच्या कन्या कु. दीप्ती कोपोलू, डॉ. साहीती कोपोलू यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि कार्यालयातील सर्वच कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांच्या वतीने नवीन प्राचार्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन प्रा.डॉ. गोविंद परडे यांनी केले.