जवळ्यात ठिक ठिकाणी संविधान दिन साजरा

संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन ग्रा. पं.कार्यालय,जि .प. शाळा व बुद्धविहारात झाला कार्यक्रम

317

नांदेड /प्रतिनिधी – आनंद गोडबोले

भारतीय संविधान दिनानिमित्त नांदेड दक्षिण मतदार संघातील व लोहा तालुक्यातील जवळा (दे) या गावी संविधान दिन साजरा करण्यात आला. ग्रा प कार्यालय जवळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा व विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सामूहिक रित्या करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, ग्रामसेवक संदीप अंबुलगेकर यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतीचे पुष्प पूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच कैलास गोडबोले, नांदेड आकाशवाणीचे आनंद गोडबोले,ग्रा प कर्मचारी मारुती चक्रधर, ग्रा प सदस्य प्रतिनिधी हरिदास पांचाळ, उपसरपंच प्रतिनिधी भारत गवळी,मुख्याध्यापक गंगाधर ढवळे ,सहशिक्षक संतोष घटकार ,अंगणवाडी कार्यकर्ती सुलोचनाबाई गच्‍चे, जि प शाळा कर्मचारी हैदर शेख ,पांडुरंग गच्‍चे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

- Advertisement -

त्यानंतर जि .प.प्राथमिक शाळा जवळा दे येथेही संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले त्यानंतर गावामध्ये संविधान रॅली काढण्यात आहे व विश्वशांती बुद्ध विहार आच्या प्रांगणामध्ये रॅली आल्यानंतर भंते धम्मपाल यांनी स्वागत केले.बुद्ध वंदनेनंतर येथेही संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. रॅलीदरम्यान लक्ष्मीबाई गच्‍चे, कमलबाई गच्चे,यांनी रॅलीस अभिवादन केले जि प शाळेत या रॅलीची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक जी एस ढवळे यांनी केले. तर संतोष घटकार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला राजू शिखरे,रत्नदीप गच्‍चे,इंदिराबाई पांचाळ यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.